• Download App
    ब्रिटनमध्ये सर्व प्रौढांना अवघ्या आठ महिन्यात मिळाली लस, सरकार सर्व निर्बंध उठविणार |Briton gave vaccine to all adult people

    ब्रिटनमध्ये सर्व प्रौढांना अवघ्या आठ महिन्यात मिळाली लस, सरकार सर्व निर्बंध उठविणार

    महत्त्वाच्या बातम्या

    लंडन – ब्रिटनमधील सर्व प्रौढांना ३१ जुलैपूर्वी लस देण्याचे येथील सरकारचे उद्दीष्ट्य वेळेआधी आजच पूर्ण झाले आहे. सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला आहे.Briton gave vaccine to all adult people

    पंतप्रधान जॉन्सन यांनी ३१ जुलैपर्यंत देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक तरी डोस देण्याचे, तसेच १९ जुलैपर्यंत किमान दोन तृतियांश प्रौढांना दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य आरोग्य यंत्रणेच्या समोर ठेवले होते. ही दोन्ही उद्दीष्ट्ये वेळेआधी साध्य झाली आहेत.



    ब्रिटन सरकार आता सर्व निर्बंध उठविणार असून या ‘फ्रिडम डे’च्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. ब्रिटनमध्ये आठ महिन्यांपूर्वी लसीकरण मोहिम सुरु झाली होती. त्यानंतर अत्यंत नियोजनपूर्वक तिची अंमलबजावणी करण्यात आली. जॉन्सन यांनी जनतेचे आभार मानताना आता उर्वरित जणांनीही तातडीने लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.

    Briton gave vaccine to all adult people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या