• Download App
    ब्रिटनच्या महाराणीला जिवे मारण्याची धमकी, आरोपी म्हणाला- मी शीख आहे, राणीला मारून जालियनवाला बागचा बदला घ्यायचाय! । Britains Queen Elizabeth Murder Threat; Sikh Jaswant Singh Arrest By Police

    ब्रिटनच्या महाराणीला जिवे मारण्याची धमकी, आरोपी म्हणाला- मी शीख आहे, राणीला मारून जालियनवाला बागचा बदला घ्यायचाय!

    Britains Queen Elizabeth : ब्रिटनमधील सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मास्क घातलेला एक व्यक्ती राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येबद्दल बोलत आहे. ही व्यक्ती स्वतःला भारतीय शीख असल्याचे सांगत आहे. तो म्हणतोय की, 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्याला राणीला मारायचे आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्कॉटलंड यार्डने तपास सुरू केला आहे. Britains Queen Elizabeth Murder Threat; Sikh Jaswant Singh Arrest By Police


    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनमधील सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मास्क घातलेला एक व्यक्ती राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येबद्दल बोलत आहे. ही व्यक्ती स्वतःला भारतीय शीख असल्याचे सांगत आहे. तो म्हणतोय की, 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्याला राणीला मारायचे आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्कॉटलंड यार्डने तपास सुरू केला आहे.

    ‘स्नॅपशॉप’वर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये मास्क घातलेला हा व्यक्ती त्याचे नाव जसवंत सिंह छैल सांगत आहे. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी मला महाराणींना मारायचे आहे, असे तो म्हणतो. हा व्हिडिओ समोर येण्यापूर्वी, ख्रिसमसच्या दिवशी विंडसरच्या राणीच्या पॅलेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना एका 19 वर्षीय व्यक्तीला क्रॉसबोसह अटक करण्यात आली होती.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कॉटलंड यार्डचे अधिकारी हा व्हिडिओ अटक केलेल्या तरुणाशी संबंधित आहे का याचा तपास करत आहेत. दरम्यान, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीला ब्रिटनच्या मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तो सध्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या देखरेखीखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    व्हिडिओमध्ये तरुण काय म्हणाला?

    व्हिडिओमध्ये हा तरुण म्हणतो, ‘मला माफ कर. मी जे काही केले आहे आणि मी काय करणार आहे त्याबद्दल मला क्षमा कर. मी राजघराण्यातील राणी एलिझाबेथच्या हत्येचा प्रयत्न करेन. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडात ज्यांनी प्राण गमावले त्यांचा हा बदला असेल.’ तो पुढे म्हणतो, ‘मी भारतीय शीख आहे. माझे नाव जसवंत सिंग छैल होते, माझे नाव डार्थ जोन्स आहे.’

    दरम्यान, 1919 मध्ये बैसाखी उत्सवादरम्यान, ब्रिटिश-भारतीय सैन्याचा कर्नल रेजिनाल्ड डायर याने एप्रिलमध्ये अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्या जमावावर गोळीबार केला होता. या अमानुष घटनेत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. राणीला धमकावणारी अटक केलेलीच व्यक्ती तर नाही ना, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

    व्हिडिओमध्ये आरोपीने घातलेला मास्क स्टार वॉर्स या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. ‘सिथ’ ही या चित्रपटातील खलनायकाची भूमिका आहे. छैलच्या व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीत स्टार वॉर्सच्या पात्र डार्थ मालगसचे चित्र होते. यासोबतच मित्रांना पाठवलेल्या मेसेजमध्ये मी ज्यांच्यासोबत चूक केली किंवा खोटे बोललो त्या सर्वांची मी माफी मागतो. जर तुम्हाला हा संदेश मिळाला असेल तर माझा मृत्यू जवळ आला आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा, असे आवाहनही आहे.

    Britains Queen Elizabeth Murder Threat; Sikh Jaswant Singh Arrest By Police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र