Britain removed India from the red list : यूकेने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यूएई, भारत आणि इतरांना रेड लिस्टमधून अंबर यादीमध्ये वर्ग केले आहे. याचा अर्थ असा की, ज्या विदेशी पर्यटकांचे कोविड -19 विरूद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे, त्यांना यापुढे 10 दिवस हॉटेल क्वारंटाइन करावे लागणार नाही. या नव्या नियमाची घोषणा करताना परिवहन विभागाने सांगितले की, रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजल्यापासून हा बदल लागू केला जाईल. Britain removed India from the red list travelers will not have to be in hotel quarantine for 10 days
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यूकेने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यूएई, भारत आणि इतरांना रेड लिस्टमधून अंबर यादीमध्ये वर्ग केले आहे. याचा अर्थ असा की, ज्या विदेशी पर्यटकांचे कोविड -19 विरूद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे, त्यांना यापुढे 10 दिवस हॉटेल क्वारंटाइन करावे लागणार नाही. या नव्या नियमाची घोषणा करताना परिवहन विभागाने सांगितले की, रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजल्यापासून हा बदल लागू केला जाईल.
यूके ट्रान्सपोर्ट सेक्रेटरीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “यूएई, कतार, भारत आणि बहरीन यांना रेड लिस्टमधून अंबर लिस्टमध्ये हलवले जाईल. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 4 वाजल्यापासून सर्व बदल प्रभावी होतील.” तथापि, अंबर यादीतील देशांतील लोकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या दोन दिवस आधी आरटी-पीसीआर चाचणी घेणे बंधनकारक असेल. तसेच, यूकेमध्ये पोहोचल्यावर 10 दिवसांसाठी होम क्वारंटाईन आणि दुसऱ्या व आठव्या दिवशी कोविडची सेल्फ-टेस्ट करावी लागेल.
यूके सरकारने असेही जाहीर केले की, फ्रान्समधून इंग्लंडला परतणाऱ्या पूर्णपणे लसीकरण केलेल्या प्रवाशांना यापुढे क्वारंटाइन ठेवणे गरजेचे नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यात यूकेने भारताला प्रवासासाठी लाल यादीत समाविष्ट केले होते.
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी सांगितले की, कोरोनाव्हायरसचे नवीन प्रकार टाळतानाच परदेशी प्रवासाला परवानगी देण्यासाठी प्रवासी उद्योग एका साध्या युजर फ्रेंडली सिस्टिमद्वारे पुढे जाताना आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी पत्रकारांना सांगितले, आम्हाला लोकांना, प्रवासी उद्योगांना पुन्हा एकदा पुढे नेले पाहिजे. आम्हाला एक दृष्टिकोन हवा आहे जो आपण करू शकतो तितका सोपा असावा.
Britain removed India from the red list travelers will not have to be in hotel quarantine for 10 days
महत्त्वाच्या बातम्या
- Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला धक्का, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची पैलवान विनेश उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
- दहशतवादी हल्ला : कलम 370 रद्द झाल्या वर्धापनदिनी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार
- Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकले कांस्य, राष्ट्रपती-पीएम मोदी म्हणाले – ऐतिहासिक विजय… एका नव्या युगाची सुरुवात!
- पंजाब निवडणुकांपूर्वी मोठी घडामोड : प्रशांत किशोर यांनी सीएम अमरिंदर यांच्या ‘मुख्य सल्लागार’ पदाचा दिला राजीनामा
- जागतिक हॉकीतला एक सर्वोत्तम सामना म्हणून भारत जर्मनी लढतीची नोंद होईल : अशोक ध्यानचंद