• Download App
    अफगाणमध्ये तालिबान्यांचे क्रूर नियम झाले सुरु, मुला-मुलींना एकत्र शिकण्यास मज्जाव boys and girls cant teach together in Afghanistan

    अफगाणमध्ये तालिबान्यांचे क्रूर नियम झाले सुरु, मुला-मुलींना एकत्र शिकण्यास मज्जाव

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तालिबानी राज्यात महिलांना विद्यापीठ पातळीवरील शिक्षण घेता येईल, पण तेथे मुला मुलींना एकत्र शिकण्यास परवानगी देणार नसल्याचे तालिबानच्या प्रभारी उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बकी हक्कानी याने स्पष्ट केले आहे. boys and girls cant teach together in Afghanistan

    अफगाणिस्तानमधील प्रमुख वृत्तवाहिनी ‘टोलो न्यूज’ने वृत्त दिले आहे. अफगाणिस्तानातील वरिष्ठ सदस्यांच्या बैठकीत हक्कानी याने हा नवा नियम जाहीर केला. देशातील सरकारी आणि खासगी महाविद्यालयामधील कर्मचारीही या बैठकीला उपस्थित होते.



     

    मुलींनी विद्यापीठात शिकण्यास परवानगी असेल, मात्र विद्यापीठ व शालेय पातळीवर मुले-मुलींना एकत्र शिकता येणार नाही. इस्लामी कायद्यानुसार महिला व पुरुष वेगवेगळ्या वर्गात शिकवणे पुढे चालू ठेवू शकतात. आणखी एका वृत्तानुसार विद्यार्थिनींना महिलांना शिकविण्यास मनाई केली आहे. यामुळे महिलांच्या उच्च शिक्षणात अडथळे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    अफगाणिस्तानवर आता तालिबानची सत्ता सुरू झाल्याची ही सारी चिन्हे दिसू लागली आहेत. या कडव्या दहशतवादी संघटनेने देशावर ताबा मिळविल्यापासून महिला व कलावंत भीतीच्या छायेखाली आहेत.

    boys and girls cant teach together in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran Claims : इराणचा दावा- ट्रम्प यांना युद्धासाठी भडकवण्यात आले; परराष्ट्र मंत्री अराघचींचा आरोप

    Iran President : इराणने आखाती देशांची माफी मागितली, अमेरिकेला उघड इशारा; आमचे भाग्य आम्ही ठरवू

    Trump : ट्रम्प म्हणाले- क्युबा सरकार लवकरच कोसळू शकते; करारासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवेन