• Download App
    पाकिस्तानात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट, ७ जण ठार; १३ जखमी । blast in pakistan baluchistan province during rally for support of palestine seven killed and 13 injured

    पाकिस्तानात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट, ७ जण ठार; १३ जखमी

    blast in pakistan : शुक्रवारी पाकिस्तानच्या नैर्ऋत्य बलुचिस्तान प्रांतात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जण ठार आणि 13 जण जखमी झाले. स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिली. बलुचिस्तान प्रांतातील सरकारचे प्रवक्ते लियाकत शाहवाणी म्हणाले की, रॅली चमन शहरातील बाजारपेठेतून जात असताना हा स्फोट झाला. blast in pakistan baluchistan province during rally for support of palestine seven killed and 13 injured


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शुक्रवारी पाकिस्तानच्या नैर्ऋत्य बलुचिस्तान प्रांतात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जण ठार आणि 13 जण जखमी झाले. स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिली. बलुचिस्तान प्रांतातील सरकारचे प्रवक्ते लियाकत शाहवाणी म्हणाले की, रॅली चमन शहरातील बाजारपेठेतून जात असताना हा स्फोट झाला.

    यापूर्वी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू आणि 14 जण जखमी झाल्याचेही शाहवानी यांनी सांगितले होते. जखमींपैकी 10 जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित लोकांना क्वेटाच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यानंतर या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

    शाहवानी म्हणाले की, पॅलेस्टाईनच्या नागरिकांबद्दल ऐक्य व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढली जात होती. या रॅलीत पश्चिम आशियामध्ये अस्थिरता निर्माण होण्याची धमकीही देण्यात आली. वास्तविक, इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या 11 दिवसांपासून संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 240 हून अधिक लोक मरण पावले आहेत.

    स्फोट झालेल्या स्थळाला सुरक्षा कर्मचार्‍यांनी घेराव घातला आहे. जमात उलेमा-ए-इस्लाम-नजरयाती (जेयूआय-एन) या इस्लामिक राजकीय संघटनेतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते अब्दुल कादिर लुनी आणि कारी महरुल्ला हेही या सभेत उपस्थित होते. दोन्ही नेते सुरक्षित आहेत.

    शाहवानी म्हणाले, “हल्लेखोर पॅलेस्टाईनप्रति एकजुटीच्या विरोधात आहेत आणि ते इस्राइलचे समर्थन करतात.” प्राथमिक चौकशी अहवालात रॅली संपण्यापूर्वीच धार्मिक नेत्यांच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडी स्फोट झाल्याचे दिसून आले. बलूचिस्तानचे मुख्यमंत्री जाम कमल खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

    अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथील सेरेना हॉटेलच्या पार्किंगमध्ये स्फोट झाला होता, त्यात 5 जण ठार आणि 12 जण जखमी झाले होते. चीनचे राजदूत त्याच हॉटेलमध्ये थांबले होते, परंतु बॉम्बस्फोटाच्या वेळी ते हॉटेलमध्ये उपस्थित नव्हते.

    blast in pakistan baluchistan province during rally for support of Palestine seven killed and 13 injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली