• Download App
    महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे सर्वत्र संताप, दिल्लीत भाजपची पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने BJP demonstrate in Delhi in front of Pak consulate

    महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे सर्वत्र संताप, दिल्लीत भाजपची पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी

    पेशावर – लाहोर किल्ल्याजवळ उभारलेल्या महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबद्दल येथील शीख समुदायाने संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाला पुतळ्याचे संरक्षण करता येत नसेल तर आम्ही तो पुतळा पेशावरमध्ये घेऊन येतो, अशी प्रतिक्रिया शीख नागरिकांनी दिली आहे.

    पाकिस्तानमधील तेहरीके लब्बैक पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने काल महाराजा रणजितसिंग यांच्या नऊ फुटी उंच ब्राँझच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.



    दरम्यान, महाराजा रणजितसिंग यांचा लाहोरमधील पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ भाजपने पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर जोरदार निदर्शने केली. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी या निदर्शनांत सहभागी झाले.

    यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. महाराजा रणजितसिंग यांच्या लाहोर किल्ल्यातील पुतळ्याची अनेकदा विटंबना करण्यात आली व पाकिस्तान सरकारने तो पुन्हा तेथे बसविला. याआधी लाहोरच्या माई जिंदा हवेलीतील पुतळ्यांचीही पाकिस्तानातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी विटंबना केली होती.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या