• Download App
    मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेटस यांचे कंपनीतच होते अफेअर, विवाहबाह्य संबंधाच्या गौप्यस्फोटाने खळबळ Bill Gates get in to trouble due extra marital affair

    मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेटस यांचे कंपनीतच होते अफेअर, विवाहबाह्य संबंधाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेटस यांचे कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याशी वीस वर्षापासून संबंध होते. हा प्रकार चौकशीतून निष्पन्न झाल्यानंतर संचालक मंडळाच्या दबावापोटी बिल गेटस यांनी २०२० मध्ये मायक्रोसॉफ्टशी नाते तोडले. गेट्स यांनी नुकतीच पत्नीला घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. Bill Gates get in to trouble due extra marital affair

    याबाबतची न्यूयॉर्क टाइम्समध्ये रविवारी प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले की, कामाच्या ठिकाणी बिल गेट्‌स यांचे असणारे वर्तन हे प्रश्नट उपस्थित करणारे होते. गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या सामाजिक संस्थेत काम केलेल्या अनेक महिलांशी शारीरिक संबंधाची मागणी केली होती.



    द वॉल स्ट्रिट जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधांचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीत अभियंता असलेल्या एका महिलेने वीस वर्षांपासून संबंध होते. त्या महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती दिली होती. यावर कंपनीच्या संचालक मंडळांनी २०१९ मध्ये एक कायद्याचा सल्ला देणाऱ्या एका संस्थेला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

    या चौकशीतून महिलेच्या आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे बिल गेट्स यांना संचालक मंडळाच्या बैठकीत बसण्यास परवानगी देणे योग्य ठरणार नाही, असा संचालक मंडळांनी विचार केला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याच्या आतच बिल गेट्स यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला.

    यासंदर्भात गेट्स यांची बाजू मांडणाऱ्या महिला प्रवक्त्याने म्हटले की, हे संबंध २० वर्षांपूर्वी प्रस्थापित झाले होते आणि ते परस्पर सामंजस्याने मिटले आहेत.

    Bill Gates get in to trouble due extra marital affair

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Trump White House : ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असताना सुरक्षेत त्रुटी, लॉकडाऊन लागू; अज्ञाताने सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला