विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी निवडणुकीदरम्यान खोट्याचा प्रचार करत लोकशाहीच्या गळ्याला नख लावले आणि त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीवर हल्ला झाला, अशा शब्दांत अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली.Biden targets Trump once again
कॅपिटॉल इमारतीवर झालेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केलेल्या भाषणात बायडेन यांनी, अमेरिकेच्या लोकशाही यंत्रणेला कायमस्वरुपी धोका निर्माण झाला असल्याचा इशाराही दिला. देशामध्ये अद्यापही राजकीय विद्वेषाचे वातावरण असल्याचे आणि ट्रम्प यांची अजूनही त्यांच्या समर्थकांवर पकड असल्याचे यावेळी दिसून आले, असे विश्लेटषकांनी सांगितले.
आपल्या भाषणात बायडेन म्हणाले,‘‘देशाच्या इतिहासात प्रथमच विद्यमान अध्यक्षांचा केवळ निवडणूकीत पराभवच झाला नाही, तर त्यांनी शांततापूर्ण सत्तेचे हस्तांतर होण्यातही अडथळे आणले. तुम्ही फक्त जिंकल्यावरच देशावर प्रेम व्यक्त करू शकता, असे नाही. जनतेने तो काळा दिवस आठवावा.
ट्रम्प यांनी खोटेपणाचा प्रचार करत लोकशाहीला नख लावले होते.’’ गेल्या वर्षभरात बायडेन यांनी कॅपिटॉलवरील हल्ल्याबाबत आणि ट्रम्प यांच्याबाबत मोजक्या शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आज मात्र त्यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाषण करताना बायडेन हे भावनिकही झाले होते.
Biden targets Trump once again
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचा संसंर्ग असूनही भाऊ खुलेआम फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त
- इटलीतून आलेल्या १९० प्रवाशांना कोरोना, अमृतसर विमानतळावर गोंधळ; दुसरी धक्कादायक घटना
- नागपुरात संघ मुख्यालयासह अन्य ठिकाणांची जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी
- RECORD VACCINATION : भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ! एक वर्ष-150 कोटी लसीकरण!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन…