वृत्तसंस्था
दुबई : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दारुण पराभव करत उपांत्य फेरीत आपली मजबूत दावेदारी सादर केली. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर ७४ धावांचे सामान्य लक्ष्य ठेवले होतं, जे कांगारू संघाने अवघ्या ६.२ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने या लक्ष्याचा पाठलाग ८२ चेंडू राखून केला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने नेट रनरेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे.Bangladesh’s drastic defeat, Australia’s claim for the semi-finals is even stronger
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेश संघ केवळ ७३ धावा करू शकला. यानंतर नेट रन रेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी कांगारू संघाला हे लक्ष्य ८.१ षटकांत गाठायचे होते. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने केवळ ६.२ षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅरॉन फिंचने २०चेंडूत ४० धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि चार षटकार आले. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरने १४ चेंडूत १८ धावांची खेळी केली. अखेरीस मिचेल मार्शने पाच चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडता नाबाद परतला.
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झम्पाच्या फिरकीसमोर बांगलादेशचा एकही फलंदाज खेळू शकला नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या ७३धावांत गारद झाला. झम्पाने आपल्या चार षटकांत अवघ्या १९ धावा देत पाच बळी घेतले. कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांग्लादेशच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बांग्लादेशचा निम्मा संघ पॉवर प्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
बांग्लादेशकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शमीम हुसेनने सर्वाधिक १९ धावा केल्या. दुसरीकडे सलामीवीर मोहम्मद नईमने १७ आणि कर्णधार महमुदुल्लाह रियादने १६ धावा केल्या. या तिघांशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्याचवेळी अॅडम झाम्पाने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक पाच बळी घेतले. याशिवाय जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कनेही प्रत्येकी दोन बळी घेतले. तर ग्लेन मॅक्सवेलला एक विकेट मिळाली.
Bangladesh’s drastic defeat, Australia’s claim for the semi-finals is even stronger
महत्त्वाच्या बातम्या
- अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?