• Download App
    हिंदू धर्मियांवर होणाऱ्या हल्ल्या विरुद्ध शेख हसीना यांनी व्यक्त केले आपले मत : बांगलादेशची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय | Bangladesh prime minister shekh hasina expresses anger agianst attack on hindu temples and hindu people

    हिंदू धर्मियांवर होणाऱ्या हल्ल्या विरुद्ध शेख हसीना यांनी व्यक्त केले आपले मत ; बांगलादेशची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय

    विशेष प्रतिनिधी

    ढाका : दुर्गा उत्सवादरम्यान बांग्लादेशमध्ये हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान शेख हसीना यांचे वक्तव्य समोर आले आहे. शेख हसीना म्हणतात, बांगलादेशमधील असा एक वर्ग आहे जो जाणूनबुजून बांगलादेशची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. धार्मिक विभाजन हा त्यांचा हेतू आहे. एका कार्यक्रमादरम्यान कोणाचेही नाव न घेता त्यांनी आपले हे मत मांडले आहे.

    Bangladesh prime minister shekh hasina expresses anger agianst attack on hindu temples and hindu people

    मागील काही दिवसांमध्ये बांगलादेशमधील हिंदूंच्या घरांवर देखील हल्ले करण्यात आले होते. 66 जणांच्या घरावर हल्ले करण्यात आले होते तर काही हिंदू घरे जळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यात एकूण पाच लोकांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान शेख हसीना यांनी मात्र  दहशतवाद आणि धार्मिक अल्पसंख्यांक लोकांवरील हिंसाचाराबद्दल शून्य-सहिष्णुता धोरण स्वीकारले आहे. त्या म्हणाल्या, आमचे सरकार धार्मिक अल्पसंख्याकांच्या सणांमध्ये नेहमीच पुरेसे संरक्षण पुरवते. या वर्षी, देशभरात सुमारे 35,000 दुर्गापूजा मंडपांची स्थापना करण्यात आली आणि कुमिल्ला, चांदपूर, नोआखली, फेणी आणि रंगपूरमधील काही अवांछित आणि जघन्य घटना वगळता उत्सव शांततेत पार पडला. 2017 मध्ये दुर्गापूजा मंडपांची एकूण संख्या 30,000 वरून वाढली, जी सरकार त्यांना पुरेशी सुरक्षा आणि इतर सुविधा पुरवत आहे हे दर्शवते.


    बांगलादेश मधील हिंसाचारा विरुद्ध लंडन येथे बांगलादेश उच्च आयुक्तालयासमोर भारतीयांची निदर्शने


    हिंदू लोकांवर झालेल्या या हल्ल्याविरुद्ध जगभरातील हिंदू लोकांनी आंदोलन करून हिंदू लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलून धरला आहे.

    Bangladesh prime minister shekh hasina expresses anger agianst attack on hindu temples and hindu people

     

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही