बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी
प्रतिनिधी
बांगलादेशची राजधानी ढाका येथील गुलिस्तान भागात आज (मंगळवार) सात मजली इमारतीला हादरे बसलेल्या भीषण स्फोटात १४ जण ठार, तर १०० हून अधिक जण जखमी झाले. याशिवाय स्फोटानंतर इमारतीला आग लागली. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण तत्काळ कळू शकले नाही, परंतु इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे साठवलेल्या रसायनांमुळे आग लागली असावी, असा स्थानिक रहिवाशांचा संशय आहे.Bangladesh 14 killed in blast in Dhaka Over 100 injured building on fire
आजूबाजूच्या लोकांना जाणवले भूंकंपासारखे धक्के –
स्थानिक दुकानदार सफायेत हुसेन यांनी डेलीस्टार वृत्तपत्राला सांगितले की, “मला सुरुवातीला वाटले की हा भूकंप आहे. स्फोटाने संपूर्ण सिद्दीक मार्केट हादरले होते. २०-२५ लोक पडक्या इमारतीसमोर रस्त्यावर पडलेले दिसून आले. ते गंभीर जखमी झाले होते, मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. ते मदतीसाठी ओरडत होते, काही लोक घाबरून इकडेतिकडे धावत होते.”
मृतांचा आकडा वाढण्याची भीती-.
स्थानिक लोक जखमींना व्हॅन आणि रिक्षातून रुग्णालयात नेत होते. स्फोटाच्या ठिकाणी राहणारे आलमगीर म्हणाले, “मोठ्या आवाजानंतर लोक घाईघाईने इमारतीतून बाहेर आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. इमारतीच्या तळघरात अनेक लोक अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. इमारतींची पाहणी करण्यासाठी रॅपिड अॅक्शन बटालियनचे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले होते.
Bangladesh 14 killed in blast in Dhaka Over 100 injured building on fire
महत्वाच्या बातम्या
- …होय भारत सोने की चिडीया! मोदी सरकारच्या काळात देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लागतोय नव्याने शोध
- Land for Jobs Scam : लालू प्रसाद यादव यांची सीबीआयकडून चौकशी सुरू; मीसा भारतींच्या घरी पोलीस दाखल!
- संसदेतील माइक बंद केल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर उपसभापती संतापले, म्हणाले- ते खोटे बोलत आहेत
- सिसोदिया यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा : पीएम मोदींना लिहिले पत्र, म्हणाले- एजन्सी त्रास देत आहेत, अटक चुकीची