• Download App
    ऑस्ट्रेलियन खासदाराचा संसदेत लैंगिक छळाचा आरोप, म्हणाल्या ‘’संसद महिलांसाठी सुरक्षित नाही’’ Australian MP Alleges Sexual Harassment in Parliament Says Parliament Not Safe for Women

    ऑस्ट्रेलियन खासदाराचा संसदेत लैंगिक छळाचा आरोप, म्हणाल्या ‘’संसद महिलांसाठी सुरक्षित नाही’’

    सिनेटच्या अभिभाषणात महिला खासदाराने आपली बाजू मांडली.

    विशेष प्रतिनिधी

    सिडनी : ऑस्ट्रेलियातील एका महिला खासदाराने आपल्या सहकाऱ्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. रडत रडत त्या म्हणाल्या की, संसद भवन हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. सिनेटच्या अभिभाषणात महिला खासदाराने आपली बाजू मांडली. Australian MP Alleges Sexual Harassment in Parliament Says Parliament Not Safe for Women

    या महिला खासदाराने हेही सागंतिले की, परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खोलीतून बाहेर पडतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.लिडिया थॉर्पने गुरुवारी सांगितले की संसदेच्या आत काही शक्तिशाली व्यक्तींनी त्यांच्यावर अश्लील टिप्पण्या केल्या, त्यांना पायऱ्यांजवळ पकडले आणि अयोग्यरित्या स्पर्श केला. लिडिया यांनी हे आरोप कंझर्व्हेटिव्ह डेव्हिड व्हॅनवर केले आहेत.

    थॉर्प यांनी बुधवारी आपल्या एका सहकारी  सीनेटरवर त्यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या आरोपांना मागे घेतल्याचाही आरोप लावा. तसेच दुसरीकडे वॅन थॉर्पद्वारे लावण्यात आलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे  असल्याचे म्हटले आहे.

    त्याचवेळी थॉर्प यांनी केलेल्या आरोपानंतर डेव्हिड व्हॅन यांच्या लिबरल पक्षाने गुरुवारी त्यांना निलंबित केले. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड व्हॅनने याप्रकरणी वकिलांचीही मदत घेतली आहे.

    Australian MP Alleges Sexual Harassment in Parliament Says Parliament Not Safe for Women

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप