• Download App
    इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य | Attack on Irans ship

    इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य

    विशेष प्रतिनिधी 

    दुबई – येमेनच्या जवळ लाल समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून नांगर टाकून उभ्या असलेल्या इराणच्या मालवाहतूक जहाजावर हल्ला झाल्याचा दावा विदेशी माध्यमांनी केला आहे. या जहाजाचा वापर इराणच्या सैन्याचा तळ म्हणून केला जात असल्याचे समजते. Attack on Irans ship

    इराणचे एमव्ही साविझ हे मालवाहतूक जहाज अनेक वर्षांपासून लाल समुद्रात आहे. यावरून सौदी अरेबियाने अनेकवेळा टीका केली आहे. या जहाजाचा वापर करून येमेनमधील हौथी बंडखोरांना इराण शस्त्रपुरवठा करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.



    इराणने बंडखोरांशी संबंध असल्याचे अनेकदा नाकारले असले तरी या बंडखोरांकडून जप्त केलेल्या शस्त्रांचा स्रोत इराणमध्येच असल्याचे उघड झाले आहे. अशा परिस्थितीत या जहाजावरच हल्ला झाला असून तो इस्राईलने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. जहाजावर स्फोट झाल्याचे विदेशी माध्यमांनी म्हटले आहे.

    इराण आणि सहा देशांमध्ये अणु कराराची अंमलबजावणी करण्याबाबत सध्या व्हिएन्ना येथे चर्चा सुरु असून अमेरिका या करारात पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेऊ शकते. जहाजावरील हल्ल्याचा या चर्चेवर परिणाम होणे शक्य आहे. या अणुकराराला इस्राईलचा तीव्र विरोध आहे.

    Attack on Irans ship


    इतर बातम्या वाचा…

     

    Related posts

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही

    Trump : ट्रम्प यांची चीनवर 200% टॅरिफची धमकी; म्हणाले- माझ्याकडे असे कार्ड आहेत, ते उघडले तर चीन नष्ट होईल