• Download App
    अल जवाहिरी ठार होताच सैफ अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या!! हा नेमका आहे कोण?? As soon as Al Zawahiri was killed, Saif Al Adel became the new leader of Al Qaeda

    अल जवाहिरी ठार होताच सैफ अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या!! हा नेमका आहे कोण??

    वृत्तसंस्था

    काबूल : ओसामा बिन लादेन याच्या नंतरचा अल कायदाचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर, आता अल कायदा संघटनेने नव्या म्होरक्याची निवड केली आहे. कुख्यात दहशतवादी सैफ अल आदेल हे त्याचे नाव आहे. अमेरिकेच्या ड्रोनहल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. As soon as Al Zawahiri was killed, Saif Al Adel became the new leader of Al Qaeda

    अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. आता अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर सैफ अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अलकायदाता आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी कारवाया करणार आहे.

     कोण आहे सैफ अल आदेल?

    सैफ अल आदेलचा जन्म 11 एप्रिल 1960 मध्ये झाला. सैफ अल आदेल हा इजिप्तचा रहिवासी आहे.

    1998 मध्ये नैरोबी येथील अमेरिकन दूतावास आणि दार ए सलाम येथे बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात आदेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.

    अमेरिकेकडून अल आदेलवर एक कोटी डाॅलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

    अल आदेल अल कायदाच्या मजलिस ए शूरा आणि लष्करी समितीचाही सदस्य आहे.

    सैफ अल आदेलने अल कायदाच्या दहशतवाद्यांना लष्करी आणि गुप्तहेरगिरीचे प्रशिक्षण दिले आहे.

    ओसामा बिन लादेननंतर अल आदेलची हंगामी नेता म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अल कायदाचा प्रमुख म्हणून अल जवाहिरीची निवड झाली होती. जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल आदेल कडेच पुन्हा अल कायद्याची सूत्रे आली आहेत.

    As soon as Al Zawahiri was killed, Saif Al Adel became the new leader of Al Qaeda

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या