इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिनिधी
इस्लामाबाद : इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज(सोमवार) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासाठी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. Arrest warrant against Pakistan former Prime Minister Imran Khan
राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ; राजनाथ सिंह, पीयूष गोयल आक्रमक, म्हणाले…
एका महिला, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात धमकीची भाषा वापरल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने हे वृत्त दिलं आहे. या वृत्तामुळे आता इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे असंही बोललं जातं आहे.
तीन दिवसांपूर्वीच बलुचिस्तान येथील न्यायालयाने इम्रान खान यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मात्र शुक्रवारी तो मागे घेतला. इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील विविध राष्ट्रीय संस्थांच्या विरोधात तिरस्कार पसरवणारी भाषणं केल्या प्रकरणी हा वॉरंट जारी करण्यात आला होता.
Arrest warrant against Pakistan former Prime Minister Imran Khan
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण
- लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील कारवाईमुळे नितीश कुमार सर्वाधिक खूश : सुशील मोदी
- शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ : किती खाली पडाल रे, वरुण सरदेसाईंना टॅग करत नरेश म्हस्केंचे ट्वीट
- मोदी कर्नाटकात, अमित शाह केरळात; राजकीय भूकंप आंध्रात, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा काँग्रेसचा राजीनामा!!