• Download App
    कोरोनापासून सुरक्षेसाठी फायझरच्या कोविड गोळीला मंजुरी|Approval of Pfizer's covid tablet for protection from corona

    कोरोनापासून सुरक्षेसाठी फायझरच्या कोविड गोळीला मंजुरी

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोनापासून सुरक्षेसाठी १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मोठा धोका असलेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी फायझरच्या कोविड गोळीला मंजुरी दिली आहे. हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे.Approval of Pfizer’s covid tablet for protection from corona

    हे औषध करोनाविरुद्धच्या लढाईत प्रभावी ठरेल, असे एफडीएचे शास्त्रज्ञ पॅट्रिझिया कॅवाझोनी यांनी सांगितले.या औषधाची २२०० नागरिकांवर चाचणी करण्यात आली. जोखीम असलेल्या नागरिकांमध्ये या औषधाने हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका ८८ टक्यांनी कमी केल्याचे दिसून आले.



    फायझरच्या उपचारांना पूर्वी युरोपियन युनियनमध्ये अधिकृत केले गेले आहे.अमेरिकेने औषधाच्या १० मिलियन कोर्सेससाठी आधीच पैसे दिले आहेत. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे अमेरिकेतही अनेक रुग्ण समोर आले आहेत. त्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

    त्याच वेळी, मर्कद्वारे विकसित केलेली आणखी एक कोविड गोळी नागरिकांच्या उपचारासाठी येत आहे. ही गोळीही पाच दिवसांसाठी घेतली जाते आणि या गोळीने करोनाचा उच्च धोका असलेल्या नागरिकांमध्ये धोका ३० टक्क्यांनी कमी केला,असा दावा करण्यात आला आहे.

    Approval of Pfizer’s covid tablet for protection from corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या