विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध ॲपल कंपनीने ‘आयपॅड प्रो २०२१’, ‘आयमॅक’, ‘ॲपल टीव्ही’ आणि ‘एअर टॅग’ यांच्यासह अन्य काही नवी उत्पादने लाँच केली आहेत.
‘ॲपल’च्या संकेतस्थळावरून आणि युट्यूब वाहिनीवरुन हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. Apple launches new products in market even in pandemic
गेल्या वर्षी अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही ‘ॲपल’ कंपनीने गेल्या वर्षांत 274.5 अब्ज डॉलरची उत्पादने विकली. मॅक आणि आयपॅड उत्पादनांनीच कंपनीला 52.3 अब्ज डॉलर मिळवून दिले होते.
कालच्या कार्यक्रमात ‘ॲपल’ कंपनीने मिनी डिस्प्ले आणि एम-१ चिप असलेला आयपॅड प्रो बाजारात आणला. ॲपलने त्यांच्या ‘ॲपल टीव्ही’मध्येही सुधारणा करत अधिक वेगवान प्रोसेसर चिप बसविली आहे.
वस्तू हरवू नये म्हणून ‘ॲपल’ने ‘एअर टॅग’ हे नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. तसेच, ‘स्पोटीफाय’ला टक्कर देण्यासाठी पॉडकास्ट सेवाही सुरु केली आहे. अधिक स्लिम असलेला ‘आयमॅक’ही कंपनीने बाजारात आणला आहे.
Apple launches new products in market even in pandemic