वृत्तसंस्था
कीव्ह : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू बुधवारी झाल्याची बातमी आहे.पंजाब मधील बर्नाला जिल्ह्यातील चंदन जिंदल हा विद्यार्थी गेल्या चार वर्षापासून युक्रेन मध्ये शिकत होता. 2 फेब्रुवारीला तो आजारी पडला होता.Another student dies in Ukraine, but due to illness !
त्याच्यावर एक शस्त्रक्रिया देखील झाली होती. 7 फेब्रुवारीला त्याचे वडील आणि त्याचे काका त्याच्या समवेत राहण्यासाठी युक्रेनला गेले होते. परंतु उपचारादरम्यान चंदनचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
चार मंत्री युक्रेन भोवतीच्या देशात
दरम्यान, युक्रेन मधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. हरदीप सिंग पुरी ज्योतिरादित्य शिंदे, व्ही. के. सिंग यांच्यासह चार मंत्री युक्रेन भोवतीचा देशांमध्ये तळ ठोकून आहेत. सर्व विद्यार्थ्यांशी या मंत्र्यांचा संपर्क झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. सुमारे 1000 विद्यार्थ्यांना घेऊन 4 मार्च रोजी 3 विमाने भारतात पोचण्याची ही माहिती आहे.
Another student dies in Ukraine, but due to illness !
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik ED : नवाब मलिकांचा पाय खोलात; बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड; उच्च न्यायालयानेही दिला दणका!!
- INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरात… गातात वंदे मातरम्
- Nawab Malik ED : नवाब मलिक यांचा मुलगा फराजच्या कंपनीचा बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 200 कोटींचा भूखंड; ईडीकडून चौकशी!!
- आरक्षण आणि भरमसाठ देणग्यांमुळे माझ्या मुलाला युक्रेनला जावे लागले; युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या नवीनच्या वडिलांची व्यथा