• Download App
    काबुल विमानतळाजवळ पुन्हा बॉम्बस्फोट, रॉकेटचाही नागरी वस्तीवर हल्ला ; इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय|Another bomb blast near Kabul airport, suspected of attacking by ISIS-K

    काबुल विमानतळाजवळ पुन्हा बॉम्बस्फोट, रॉकेटचाही नागरी वस्तीवर हल्ला ; इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय

    वृत्तसंस्था

    काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील विमनातळाजवळ रविवारी पुन्हा बॉम्बस्फोट झाला आहे. इस्लामिक स्टेट खोरासनवर या हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.Another bomb blast near Kabul airport, suspected of attacking by ISIS-K

    अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी दोन बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यानंतर काबूल सावरत असताना रविवारी पुन्हा मोठा बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यापूर्वीच २४ ते ३६ तासांत बॉम्बस्फोट होईल, असा इशारा दिला होता.



    अफगाण माध्यमांननुसार, काबुल शहरात हा मोठा स्फोट झाला आहे. काबुल विमानतळाजवळील खाजेह बागरा या निवासी भागात एका घरावर रॉकेट डागले आहेत. ज्या घरात हे रॉकेट पडले त्या घरातील एका मुलाचा मृत्यू तर तीन जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही, पण इस्लामिक स्टेट खोरासन या दहशतवादी संस्थेवरच या हल्ल्याचा संशय आहे.

    गुरुवारच्या हल्ल्यात १७० नागरिक ठार

    दरम्यान, अमेरिकन दूतावासाने सलग तिसऱ्या दिवशी काबुल विमानतळावर हल्ल्याच्या धमकीचा इशारा जारी केला होता. अमेरिकेने नागरिकांना काबुल विमानतळ आणि परिसरातून त्वरित माघार घेण्यास सांगितले. अमेरिकेने गुरुवारी काबूल विमानतळावर धोक्याबाबत पहिला अलर्ट जारी केला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी दहशतवादी संघटना ISIS-Khorasan (ISIS-K) ने विमानतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांसह १७० लोक मारले गेले.

    इस्लामिक स्टेटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

    इस्लामिक स्टेट खोरासनने २६ ऑगस्ट रोजी काबुल विमातळाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिसच्या अड्ड्यांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर दहशतवादी अधिक आक्रमक झाले असून त्या रागातून त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    Another bomb blast near Kabul airport, suspected of attacking by ISIS-K

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या