• Download App
    भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री , पंतप्रधान ट्रुडो यांनी केली नवीन मंत्रिमंडळाची घोषणा |Anita Anand, of Indian descent, becomes Canada's new defense minister, Prime Minister Trudeau announces new cabinet

    भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री , पंतप्रधान ट्रुडो यांनी केली नवीन मंत्रिमंडळाची घोषणा

    याशिवाय भारतीय-कॅनडियन महिला कमल खेरा यांची ज्येष्ठ नागरिक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्या ब्रॅम्प्टन वेस्टच्या 32 वर्षीय खासदार आहेत.Anita Anand, of Indian descent, becomes Canada’s new defense minister, Prime Minister Trudeau announces new cabinet


    वृत्तसंस्था

    टोरंटो : भारतीय-कॅनडियन राजकारणी अनिता आनंद यांची मंगळवारी कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिक हरजीत सज्जनची जागा घेणार आहे. सज्जन हे दीर्घकाळ देशाचे संरक्षण मंत्री राहिलेत. हरजीत सज्जन यांना आता आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री करण्यात आले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली.

    याशिवाय भारतीय-कॅनडियन महिला कमल खेरा यांची ज्येष्ठ नागरिक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्या ब्रॅम्प्टन वेस्टच्या 32 वर्षीय खासदार आहेत. त्यामुळे ट्रुडो मंत्रिमंडळातील भारतीय-कॅनडियन महिला मंत्र्यांची संख्या तीन झाली आहे. नव्या मंत्रिमंडळात सहा महिला मंत्र्यांमध्ये दोन इंडो-कॅनडियन महिलांचा समावेश आहे.



    कॅनडाच्या लष्करातील लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल ट्रूडो यांनी हरजित सज्जन यांची पदावनती केली आणि अनिता आनंद आणि कमल खेरा यांना त्यांच्या साथीच्या काळात केलेल्या कामाबद्दल सन्मानित केले.

    कोण आहेत अनिता आनंद

    अनिता यांचा जन्म नोव्हा स्कॉशिया येथे १९६७ मध्ये झाला. त्याचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. आई सरोज डी. राम पंजाबचे आणि वडील एस.व्ही. आनंद तामिळनाडूचे आहेत. अनिता आनंद या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक आहेत.

    टोरंटोजवळील ओकविले येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना २०१९ मध्ये पंतप्रधान ट्रुडो यांनी सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री म्हणून जबाबदारी दिली.अनिता आनंद यांच्या आधी, कॅनडाच्या एकमेव महिला संरक्षण मंत्री माजी पंतप्रधान किम कॅम्पबेल होत्या, ज्यांनी १९९३ मध्ये ४ जानेवारी ते २५ जून या सहा महिन्यांसाठी पोर्टफोलिओ सांभाळला होता.

    Anita Anand, of Indian descent, becomes Canada’s new defense minister, Prime Minister Trudeau announces new cabinet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप