विशेष प्रतिनिधी
बर्लिन : युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या आवेशपूर्ण भाषणाला युरोपीयन संसदेच्या सर्व सदस्यांनी उभे राहून मानवंदना दिली. युरोपच्या संसदेत एक मिनिटे सदस्यांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. शेवटी जेव्हा झेलेन्स्की यांनी स्वत:हून संसदेचा निरोप घेतला आणि ते स्क्रीनमधून बाहेर पडले, तेव्हा कुठे हा कडकडाट कमी होत थांबला.An applause followed the impassioned speech of Ukrainian President Zhelensky
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यावेळी आवेशपूर्ण भाषण केले. ते म्हणाले, आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरं बंद झाली आहेत. पण तरी देखील कुणीही आम्हाला तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत. आम्ही युक्रेनचे नागरिक आहोत. आमच्या मुलांना जिवंत ठेवण्याची आमची इच्छा आहे. माझ्या मते ही अगदीच रास्त इच्छा आहे.
पुतीन यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधताना झेलेन्स्की म्हणाले, काल इथे १६ मुलं मारली गेली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन वारंवार हेच सांगत आहेत की ते एक प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत ज्यात फक्त लष्कराची ठाणीच टार्गेट केली जात आहेत.
पण तिथे मुलं होती. ते नेमकी कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत? कोणते टँक ते घेऊन जात आहेत. मिसाईल्स डागत आहेत. त्यांनी काल १६ मुलांना मारले. आमचा निर्धार पक्का आहे. आमचं मनोधैर्य प्रचंड उंचावलेलं आहे. आम्ही लढत आहोत.
आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी. आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत.
झेलेन्स्की यांनी युरोपला मदतीचं आवाहन केले. ते म्हणाले, आम्ही जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटं पडेल. आम्ही आमचं सामर्थ्य सिद्ध केलं आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केलं आहे की आम्ही देखील तुमच्यासारखेच आहोत.
त्यामुळे हे सिद्ध करा की तुम्हीदेखील आमच्यासोबत आहात. हे सिद्ध करा की तुम्ही आम्हाला एकटं सोडणार नाहीत. हे सिद्ध करा की तुम्ही खरंच युरोपियन आहात. मग जीवन हे मृत्यूसमोर विजयी होईल. प्रकाशाचा अंधारावर विजय होईल.मला माफ करा मी तुम्हाला गुड डे असं म्हणू शकत नाही.
An applause followed the impassioned speech of Ukrainian President Zhelensky
महत्त्वाच्या बातम्या
- हरियाणातील निवडणुकीचा व्हिडीओ दाखवित अखिलेश यादव यांची कुंडातील निवडणूक रद्द करण्याची मागणी, राजा भय्या संतापले
- RUSSIA-UKRAINE WAR : युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
- किरीट सोमय्यांच्या मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- रक्ताच्या वारसदारांकडून दलितांची दिशाभूल; आंबेडकर यांचे नाव न घेता डॉ. राऊत यांचा हल्ला
- महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा थकित रकमेत सवलत, पुन्हा वीज जोडणी देणारी नवी योजना