• Download App
    American Visa Application : अमेरिकेची मोठी घोषणा, यावर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणारAmerican Visa Application Americas big announcement visa will be given to 10 million Indians this year

    American Visa Application : अमेरिकेची मोठी घोषणा, यावर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार

    US Visa News: अमेरिकेकडून भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने भारतीयांसाठी व्हिसा स्लॉट उघडले. आता पुन्हा एकदा अमेरिकेने भारतीयांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. अमेरिकेने या वर्षी दहा लाख भारतीय नागरिकांना व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. American Visa Application Americas big announcement visa will be given to 10 million Indians this year

    इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी केलेल्या संभाषणात अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएस मिशनने भारतातील आमच्या दूतावास आणि वाणिज्य दूतावासात दोन लाखांहून अधिक अर्जांवर प्रक्रिया केली आहे. 2023 पर्यंत दहा लाखांहून अधिक नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्जांवर प्रक्रिया करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहोत.


    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातील मशीद हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!


    आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिकी दूतावासात कर्मचारी वाढवले जात आहेत. याशिवाय ड्रॉप-बॉक्स सुविधांची व्याप्ती वाढवली जात आहे आणि  भारतीय नागरिकांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी मुलाखतीचे स्लॉट उघडण्याची तयारीही केली जात आहे. व्हिसाच्या प्रतीक्षेच्या वेळा आधीच कमी झाल्या आहेत.

    जानेवारीमध्ये अमेरिकन दूतावासाने शनिवारी मुलाखतीचे स्लॉट देण्यास सुरुवात केली. त्या मागचा उद्देश कोरोना महामारीमुळे व्हिसाचा बॅकलॉक भरून काढणे होता. याचबरोबर एका निवेदनात, यूएस मिशनने म्हटले आहे की त्यांनी भारतातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथील कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे.

    दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की १० लाख व्हिसा देण्याची योजना केवळ भारतीयांसाठी आहे. यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांचे संबंध अधिक दृढ होतील. यूएस व्हिसा मागणाऱ्या भारतीय नागरिकांनाही मुलाखतीची सूट नुकतीच वाढवण्यात आली आहे.

    American Visa Application Americas big announcement visa will be given to 10 million Indians this year

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या