वृत्तसंस्था
काबूल : लष्करास मदत करणारे प्रसंगी प्राणाची बाजी लावून सैनिकांचे प्राण वाचविणारे लष्करी श्वान अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानात ठेऊन अमेरिकेकडे प्रयाण केले. त्यामुळे प्राणीप्रेमी हळहळले आहेत. या मुद्यावरून लष्करावर टीका होत आहे. American troops leave black military contract working dogs in Kabul.
अफगाणिस्तानातील दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेने २० वर्षे मोहीम राबविली. ३१ ऑगस्ट रोजी सर्व सैन्य मागे घेतले. परंतु अनेक श्वानांना तेथेच ठेऊन सैनिक अमेरिकेला गेले.
प्रशिक्षित श्वानांचा उपयोग स्फोटके शोधणे, आरोपीचा माग काढणे, यासाठी जगभर वापर केला जातो. त्या प्रमाणे अमेरिका सुद्धा श्वानाचा वापर करते. या श्वानांचा वापर अफगाण मोहीमेत केला.
पण गरज सरो वैद्य मरो, या प्रमाणे श्वानांना अफगाणिस्तानात सोडले आहे. हे श्वान खतरनाक असल्याने त्यांना पिंजऱ्यात कोंडले असून अनेक पिंजरे असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या श्वानांनी k- 9 soldiers असे संबोधले जाते. याचा अर्थ त्यांना सैनिकाप्रमाणे दर्जा आहे. त्यांची जीवनभर काळजी घेतली जाते. पण, अमेरिकेच्या लष्कराच्या या कृतीमुळे जगभरात नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.
American troops leave black military contract working dogs in Kabul.
महत्त्वाच्या बातम्या