• Download App
    काबूलबाहेर पडण्याची पाच बहिणींची धडपड, तालिबानींनी घर जाळलं; जीव वाचवण्यासाठी विमानतळावर आटापिटा Afghanistan Taliban: Taliban burn down house, reach airport to save lives; 5 sisters share Incident

    काबूलबाहेर पडण्याची पाच बहिणींची धडपड, तालिबानींनी घर जाळलं; जीव वाचवण्यासाठी विमानतळावर आटापिटा

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्याचा कब्जा झाल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. काबुल विमानतळावर गोंधळ उडाला आहे. तालिबानींच्या जाचातून सुटका करण्यासाठी लोक अफगाणिस्तान सोडण्यासाठी धडपडत आहेत. काबुल विमानतळावर हजारोंच्या संख्येने महिला तालिबानींच्या हातून त्यांची इज्जत आणि जीव दोन्ही वाचविण्यासाठी विमानाची प्रतिक्षा करत आहेत. Afghanistan Taliban: Taliban burn down house, reach airport to save lives; 5 sisters share Incident

    काबुल विमानतळाबाहेर गर्दीत अडकलेल्या पाच बहिणींनी एक थरारक प्रसंग सांगितला. तालिबानींनी त्या बहिणींच घर जाळलं. अफगाणिस्तानातून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात त्या आहेत. या बहिणी हजारा समुदायाच्या आहेत. हिंदू कुश डोंगरातील मध्य अफगाणिस्तानात हजराजतमध्ये राहणारा शिया समूह आहे. तालिबानी विशेषत: महिलांचे शोषण करत आहेत.



    हायस्कूलमध्ये शिकणारी १९ वर्षाची विद्यार्थिनी आईना शेख म्हणाली की, ती तिच्या ४ बहिणी आणि भावासोबत विमानतळावर आहोत. आम्हाला अमेरिकेत जायचं आहे. आम्ही सुरक्षित नाही. कुणाकडेही पासपोर्ट नाही. व्हिसा कागदपत्रे अपूर्ण असल्याने प्रवासाची परवानगी मिळत नाही. परंतु त्यांना देश सोडण्यासाठी कुणीतरी मदत करेल ? या आशेवर त्या जगत आहेत.

    आईना म्हणते की, आम्ही आमच्या घरात हसत-खेळत जीवन जगत होतो. त्यानंतर तालिबानीनी घर जाळलं. जीवाला धोका होता. त्यामुळे आईवडिलांनी आम्हाला जायला सांगितले. तालिबानींनी महिला आणि मुलींना पत्नी किंवा सेक्स स्लेव बनवण्याच्या बातम्या आल्या होत्या. तालिबानींच्या दहशतीपासून वाचत आम्ही ५ भावंडे काबुल विमानतळावर २४० किमी प्रवास करून आलो. पदपाथवर झोपतोय.

    २५ वर्षाचा भाऊ नादेर आणि एक सेल्समॅन रक्षण करतो. आमच्याकडे काही पैसे आहेत तेच खर्च करतो. मला माहिती नाही हे कधीपर्यंत चालेल. तालिबानींच्या दहशती आम्हाला ठाऊक नाहीत परंतु आमच्या आईवडिलांनी सांगितले की, इतिहासात तालिबानींनी हजारा समुदायाच्या हजारो लोकांना मारलं होतं. आइनाची २३ वर्षीय बहिण हाफिजाह काबुलच्या एका पॉलिटेक्निकमध्ये कॅम्प्यूटर विज्ञानाचं शिक्षण घेते. तर तिच्या अन्य बहिणी हवा, लतीफा आणि १८ वर्षाची मरजानही आहे.

    Afghanistan Taliban: Taliban burn down house, reach airport to save lives; 5 sisters share Incident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार