विशेष प्रतिनिधी
काबूल: तालीबानविरुध्द लढण्यासाठी अफगाण सरकारने भारताकडे मदत आणि सहकार्याची अपेक्षा केली आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली.Afghanistan seeks India’s help in fighting Taliban
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचे हल्ले वाढत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांशी भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. काही शहरांमध्ये अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.
अशा परिस्थितीत तालिबानकडून सुरू असलेला हिंसाचार आणि मानवाधिकाराचे होणारे हनन रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत तातडीने सत्र बोलावण्यासाठी अफगाणिस्तानने चाचपणी केली असल्याचे म्हटले जाते.
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अतमार यांनी तालिबान व परदेशी दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा केली. भारताने तातडीने युनोमध्ये चर्चा करण्याची मागणी केली. ऑगस्ट महिन्यात युनोचे अध्यक्षपद भारताकडे आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनी म्हटले की, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत चर्चा केली. युनोमध्ये अफगाणिस्तानमधील हिंसाचाराबाबत आपात्कालीन सत्र बोलावण्याची मागणी केली. अतमार यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानचा हिंसाचार आणि अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही त्यांनी म्हटले.
अफगाणिस्तान परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये वाढत असलेला हिंसाचार आणि मानवाधिकारांचे होणारे उल्लंघन याबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली.
Afghanistan seeks India’s help in fighting Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील वीज कंपन्यांचा तोटा ९० हजार कोटींपर्यंत पोहोचले, निती आयोगाचा अहवाल
- कडक सॅल्यूट ; दहावीमध्ये पाच विषयांत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या कुमार विश्वास सिंहला जायचेय लष्करात
- कोरोना बॅचला फटका बसण्यास सुरूवात, एचडीएफसी बँकेने चक्क जाहिरातीत म्हटले की कोरोना काळातील उत्तीर्णांनी अर्ज करू नयेत
- पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत बदल, ८ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्टला होणार