• Download App
    तब्बल 1250 कोटी रुपये घेऊन अशरफ घनी पळून गेले, या स्टार अफगाणी क्रिकेटपटूनेही सोडला देश । Afghanistan President Ashraf Ghani Left Kabul with family and Mohammad Nabi for UAE

    तब्बल 1250 कोटी रुपये घेऊन अशरफ घनी पळून गेले, या स्टार अफगाणी क्रिकेटपटूनेही सोडला देश

    Afghanistan President Ashraf Ghani : तालिबानने सत्ता हस्तगत केल्यावर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. राजधानी काबूल येथून विशेष रशियन विमानाने घनी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे पोहोचले. पण ताजिकिस्तान सरकारने त्यांना उतरण्याची परवानगी दिली नाही. यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष आखाताकडे वळले. अशरफ घनी आपले कुटुंबीय आणि 51 लोकांसह यूएईला पोहोचले. यूएई सरकारने ते देशात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून म्हटले की, त्यांना माणुसकीच्या आधारावर देशात आश्रय देण्यात आला आहे. Afghanistan President Ashraf Ghani Left Kabul with family and Mohammad Nabi for UAE


    विशेष प्रतिनिधी

    काबूल : तालिबानने सत्ता हस्तगत केल्यावर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला. राजधानी काबूल येथून विशेष रशियन विमानाने घनी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे पोहोचले. पण ताजिकिस्तान सरकारने त्यांना उतरण्याची परवानगी दिली नाही. यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष आखाताकडे वळले. अशरफ घनी आपले कुटुंबीय आणि 51 लोकांसह यूएईला पोहोचले. यूएई सरकारने ते देशात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून म्हटले की, त्यांना माणुसकीच्या आधारावर देशात आश्रय देण्यात आला आहे.

    स्टार क्रिकेटपटू मो. नबीसुद्धा घनींसोबत पळाला

    अशरफ घनी यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब, अफगाणिस्तानचे एनएसए मोहिब आणि अफगाणिस्तान संघाचा स्टार क्रिकेटर मोहम्मद नबीदेखील यूएईला पोहोचले आहेत. गनीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांची पत्नी रुला एफ सद्दाह घनी, त्यांची मुलगी मरियम आणि मुलगा तारिक घनी यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. एकूण 51 जण विशेष विमानाने यूएईला पोहोचले. त्याच वेळी घनींवर आरोप आहेत की, ते त्यांच्याबरोबर 169 दशलक्ष डॉलर (सुमारे 1250 कोटी रुपये) घेऊन पळून गेले आहेत. तालिबान सत्तेत परत आल्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे घनी यांनी आधीच सांगितले होते.

    अशरफ घनींनी सांगितले देश सोडण्याचे कारण

    घनी यांनी बुधवारी रात्री उशिरा आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामुळे ते संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये असल्याची खात्री पटली. अशरफ घनी यांनी काबूल सोडून पळून जाण्याच्या त्यांच्या निर्णयाचा बचाव केला. रक्तपात थांबवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या राजदूताच्या खजिन्यातून 169 दशलक्ष डॉलर्स चोरल्याचा आरोप फेटाळण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला.

    Afghanistan President Ashraf Ghani Left Kabul with family and Mohammad Nabi for UAE

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार