kabul mosque blast : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, यात अनेक नागरिक मारले गेले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु असा विश्वास आहे की हा हल्ला इसिस-के म्हणजेच इस्लामिक स्टेट-खोरासनने केला आहे. ही इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेची अफगाणिस्तानातील शाखा आहे. इसिस हा तालिबानचा कट्टर शत्रू मानला जातो. त्यांच्याकडून तालिबानच्या विरोधात सातत्याने हल्ले सुरू असतात. Afghanistan near kabul mosque blast many civilians killed said taliban
वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, यात अनेक नागरिक मारले गेले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु असा विश्वास आहे की हा हल्ला इसिस-के म्हणजेच इस्लामिक स्टेट-खोरासनने केला आहे. ही इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी संघटनेची अफगाणिस्तानातील शाखा आहे. इसिस हा तालिबानचा कट्टर शत्रू मानला जातो. त्यांच्याकडून तालिबानच्या विरोधात सातत्याने हल्ले सुरू असतात.
मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका मशिदीच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले आहेत. काबूलमधील ईदगाह मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्बस्फोट झाल्याचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी ट्विट केले. मात्र, तालिबान सरकारने या हल्ल्यात किती लोक मारले गेले याबद्दल काहीही सांगितले नाही.
बॉम्बस्फोट झाल्यानंतर गोळीबार
जबीउल्लाह मुजाहिद तालिबान सरकारमध्ये माहिती आणि संस्कृती मंत्रालयात उपमंत्री आहेत. ते म्हणाले की, रविवारी दुपारी एका गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. मुजाहिद म्हणाले की, आज दुपारी जेवणानंतर मशिदीच्या गेटजवळ अचानक स्फोट झाला. त्या वेळी तेथे बरेच लोक असल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाल्यानंतर गोळीबार झाला आहे.
Afghanistan near kabul mosque blast many civilians killed said taliban
महत्त्वाच्या बातम्या
- परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास, सप्टेंबरमध्ये भारतात तब्बल 26517 कोटी रुपयांची गुंतवणूक
- अंबानी, अदानी आणि टाटाशी स्पर्धा करण्यासाठी एनटीपीसीचा मेगा प्लॅन, 2024 पर्यंत निर्गुंतवणुकीद्वारे 15 हजार कोटी गोळा करणार
- काँग्रेसचा आरोप : मुंद्रा बंदर ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी एनसीबीचा क्रूझवर छापा
- ड्रग्ज प्रकरणात आर्यनचे नाव आल्यानंतर बॉलीवूडमध्ये गटबाजी सुरू, शाहरुखचा मित्र सुनील शेट्टीने आर्यनला दिला पाठिंबा
- यवतमाळच्या धीरज जगतापने 10 वर्षांपूर्वीच स्वीकारला इस्लाम, अवैध धर्मांतरात सक्रिय, एटीएसने कानपूरमधून केली अटक