• Download App
    Afghanistan Crisis : पत्रकाराला शोधण्यासाठी तालिबान्यांकडून घरोघरी शोधमोहीम, कुटुंबीयांची केली निर्घृण हत्या । Afghanistan Crisis Taliban conduct house-to-house search to find journalist, kill his family member

    Afghanistan Crisis : तालिबान्यांकडून पत्रकाराच्या शोधासाठी घरोघरी धाडी, कुटुंबीयांची केली निर्घृण हत्या

    Afghanistan Crisis : जर्मन ब्रॉडकास्टर डीडब्ल्यूसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराचा पाठलाग करणाऱ्या तालिबानी अतिरेक्यांनी त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तालिबान्यांनी पत्रकाराचा घरोघरी जाऊन शोध घेतला. त्यांना पत्रकाराला ठार करायचे आहे. हा पत्रकार डीडब्ल्यूसाठी सध्या जर्मनीत काम करतो. हल्ल्यादरम्यान पत्रकाराचे इतर नातेवाईक पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु आता ते तालिबान्यांच्या भीतीने लपून बसले आहेत. Afghanistan Crisis Taliban conduct house-to-house search to find journalist, kill his family member


    वृत्तसंस्था

    काबूल : जर्मन ब्रॉडकास्टर डीडब्ल्यूसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराचा पाठलाग करणाऱ्या तालिबानी अतिरेक्यांनी त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तालिबान्यांनी पत्रकाराचा घरोघरी जाऊन शोध घेतला. त्यांना पत्रकाराला ठार करायचे आहे. हा पत्रकार डीडब्ल्यूसाठी सध्या जर्मनीत काम करतो. हल्ल्यादरम्यान पत्रकाराचे इतर नातेवाईक पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु आता ते तालिबान्यांच्या भीतीने लपून बसले आहेत.

    पत्रकाराचे इतर नातेवाईक शेवटच्या क्षणी पळून जाण्यात यशस्वी झाले आणि आता ते फरार आहेत. डीडब्ल्यूचे संचालक पीटर लिम्बर्ग यांनी याप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी जर्मन सरकारला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

    ते म्हणाले की, “तालिबान्यांनी काल आमच्या एका संपादकाच्या जवळच्या नातेवाईकाची हत्या केली. हे अकल्पनीय आणि दुःखद आहे. अफगाणिस्तानातील आमचे सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्या गंभीर संकटात सापडले आहेत, हा हल्ला त्याची साक्ष देतो. तालिबानने आधीपासूनच काबूल आणि इतर प्रांतांमध्ये पत्रकारांचा पाठलाग सुरू केला आहे.”

    तालिबान्यांकडून पत्रकारांचा पाठलाग

    तालिबानने किमान तीन डीडब्ल्यू पत्रकारांच्या घरांवर छापा टाकला आहे. खासगी दूरचित्रवाणी केंद्राच्या नेमतुल्लाह हेमतचे तालिबान्यांनी अपहरण केल्याचे मानले जाते. सरकारी अधिकार्‍यांच्या मते, तालिबानी अतिरेक्यांनी त्याची हत्या केली आहे. पाश्चात्य माध्यमांसाठी काम करणाऱ्या वार्ताहरांना आता लक्ष्य केले जात आहे. हे लक्षात घेऊन जर्मन पत्रकार संघाने (डीजेव्ही) जर्मन सरकारला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

    Afghanistan Crisis Taliban conduct house-to-house search to find journalist, kill his family member

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!