• Download App
    तालिबानविरोधात महिला उतरल्या रस्त्यावर; शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देण्याची मागणी ।Afghan Women Protest Against Taliban In Herat City Demands Right To Work Education And Empowerment

    तालिबानविरोधात रस्त्यावर उतरल्या महिला; शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देण्याची मागणी

    Afghan Women Protest Against Taliban : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर देशात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लहान मुले असोत की वडीलधारे, प्रत्येक समुदाय तालिबानविरोधात तोंड उघडण्यास घाबरत आहे. या दहशतीदरम्यान देशाच्या पश्चिमेस असलेल्या हेरात शहरात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तालिबान्यांनी शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला आहे. 15 ऑगस्ट रोजी काबूल जिंकल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाला. अमेरिकन सैन्यानेही पूर्णपणे माघार घेतली आहे. Afghan Women Protest Against Taliban In Herat City Demands Right To Work Education And Empowerment


    वृत्तसंस्था

    काबूल : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर देशात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लहान मुले असोत की वडीलधारे, प्रत्येक समुदाय तालिबानविरोधात तोंड उघडण्यास घाबरत आहे. या दहशतीदरम्यान देशाच्या पश्चिमेस असलेल्या हेरात शहरात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. तालिबान्यांनी शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला आहे. 15 ऑगस्ट रोजी काबूल जिंकल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाला. अमेरिकन सैन्यानेही पूर्णपणे माघार घेतली आहे.

    धोका असूनही हेरातमधील काही महिलांनी मोठे धैर्य दाखवले असून तालिबानी राजवटीपुढे त्यांच्या मागण्या मांडल्या. तालिबानच्या विरोधात अशा प्रकारचा हा पहिलाच निषेध आहे.

    टोलो न्यूजने दिली बातमी

    तालिबान बऱ्याचदा बंदुकीच्या बळावर त्यांच्या विरोधातील आवाज दाबतो. गुरुवारी हेरातमध्ये निषेध करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या, तेव्हा ही बातमी टोलो न्यूजच्या प्रतिनिधी झहरा रहिमी यांनी जगासमोर आणली. त्यांनी सोशल मीडियावर एका फोटोसह ही बातमी शेअर केली.

    काय म्हणाल्या महिला?

    निषेधामध्ये सामील असलेल्या 24 वर्षीय मरियम अब्राम यांनी नंतर ‘अल -जझीरा’ टीव्हीला सांगितले – आम्ही सक्तीने विरोध करण्याचा निर्णय घेतला. महिलांना रोजगाराच्या संधी देण्याबाबत तालिबान स्पष्टपणे बोलण्यास तयार दिसत नाही. आम्हाला सांगितले जात आहे की, तुम्ही कामावर जाऊ शकत नाही. जर तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर ते तिथून परत केले जाते. आम्ही पोलीस प्रमुख आणि सांस्कृतिक संचालकांशीही बोललो. त्यांनी लोकशाही संपवून देश काबीज केला आहे. मग आता आम्ही करणार काय?

    मरियम पुढे म्हणाल्या- मी इतर काही महिलांना सोबत घेतले आणि तालिबानी अधिकाऱ्यांना भेटले. नेमक्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यास सांगितले. ते महिलांना शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देतील की नाही माहिती नाही. दुर्दैवाने आजपर्यंत तालिबानने कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. आता आमचा आवाज संपूर्ण देश ऐकेल. तालिबान आजही तसेच आहेत जसे ते 20 वर्षांपूर्वी होते.

    गनी भ्रष्ट होते, तर मग हे काय आहेत?

    मरियम पुढे म्हणाल्या- तालिबानचे म्हणणे आहे की अशरफ घनी यांचे पूर्वीचे सरकार भ्रष्ट होते, पण ते काय करत आहेत? त्यांचे नेते शेर मोहम्मद स्टानकझाई म्हणतात की, महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही. आम्ही आमच्या हक्कांची मागणी करत आहोत. तालिबान सरकार महिलांशिवाय चालणार नाही. जर नॅशनल असेंब्ली (लोया जिरगा) मध्ये महिलांना समान वाटा मिळाला, तर आम्ही ते स्वीकारू.
    तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर अनेक वेळा सांगितले आहे की, त्यांना महिलांना शरियतच्या चौकटीत राहून काम करण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार द्यायचा आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात ठोस पावले उचलली गेली नाहीत.

    Afghan Women Protest Against Taliban In Herat City Demands Right To Work Education And Empowerment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!