• Download App
    अफगाण सैन्याने नऊशेहून अधिक तालीबान्यांचा गेल्या नऊ दिवसांत केला खात्मा|Afghan forces have killed more than 900 Taliban in the past nine days

    अफगाण सैन्याने नऊशेहून अधिक तालीबान्यांचा गेल्या नऊ दिवसांत केला खात्मा

    विशेष प्रतिनिधी

    कंधार: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालीबान्यांनी देशावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. मात्र, अफगाण सैन्याने तालीबान्यांना जोरदार प्रत्युत्तर देत गेल्या नऊ दिवसांत नऊशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.Afghan forces have killed more than 900 Taliban in the past nine days

    अफगाणिस्तान आणि तालिबानमधील संघर्ष वाढला आहे. एका हल्ल्यात अफगाण सैन्याने तालिबानचे सुमारे ३०० दहशतवादी मारल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केलाय. अफगाण सैन्याने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तालिबानचे शेकडो दहसतवादी ठार झाले आहेत. अनेकजण जखमी झालेत, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.



    संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटनुसार, रविवारी गजनी, कंधार, हेरात, फराह, जोजजान, बल्ख, समांगन, हेलमंद, तखर, कुंदुज, बगलान, काबुल आणि कपिसा राज्यात अफगाणिस्तानच्या सैन्याने कारवाईत 300 पेक्षा जास्त तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले तर ९७ पेक्षा जास्त जखमी झाले.

    गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्थानात असल्यामुळे तालीबान्यांना डोके वर काढण्यास संधी मिळाली नव्हती. पण अमेरिकन सैन्य निघून जाताच तालीबान्यांकडून हिंसाचार वाढला आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या सुमारे ८० ते ८५ टक्के भागावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

    अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने १९३ जिल्हा केंद्र आणि १९ सीमावर्ती जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे. तालिबानने तखर, कुंदुज, बदख्शां, हेरात आणि फराह राज्यातील सीमावर्ती केंद्र असलेल्या १० ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. यामुळे व्यापारावरही मोठा परिणाम झालाय. १४ एप्रिलपासून आतापर्यंत तालिबानने ४ हजार अफगाणी सैनिकांना मारले असून, सात हजारपेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

    सोळाशे जणांना तालिबानने पकडून नेले आहे. दोन हजारांहून अधिक सामान्य नागरिकांचाही तालीबान्यांच्या हल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये यात महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

    Afghan forces have killed more than 900 Taliban in the past nine days

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या