• Download App
    28 हजार फूट उंचीवर महिलेला प्रसूती कळा , C-17 ग्लोबमास्टरमध्ये झाली प्रसूती , दिला एका गोंडस मुलीला जन्म A woman gave birth to a cute baby girl at an altitude of 28,000 feet, gave birth in C-17 Globemaster

    28 हजार फूट उंचीवर महिलेला प्रसूती कळा , C-17 ग्लोबमास्टरमध्ये झाली प्रसूती , दिला एका गोंडस मुलीला जन्म 

    ही घटना शनिवारची आहे. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे हजारो अफगाण नागरिक आपला देश सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत. प्रसूत झालेली महिला अशाच नागरिकांपैकी एक आहे.A woman gave birth to a cute baby girl at an altitude of 28,000 feet, gave birth in C-17 Globemaster


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन: काबूलमधून निघालेल्या अमेरिकेच्या लष्करी विमानामध्ये एका अफगाणि महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. जर्मनीच्या रामस्टीन एअर बेसवर विमानाने लँडिंग करताच महिलेची प्रसूती झाली.

    ही घटना शनिवारची आहे. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यामुळे हजारो अफगाण नागरिक आपला देश सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत. प्रसूत झालेली महिला अशाच नागरिकांपैकी एक आहे.

    C-17 ग्लोब मास्टर विमानामध्ये असताना या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या असे यूएस एअर मोबिलिटी कमांडने रविवारी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. “विमान २८ हजार फूट उंचीवर असताना विमानात हवेचा दाब कमी असल्याने महिलेला त्रास सुरु झाला” असे अमेरिकन एअर फोर्सने सांगितलं.



    विमानाच्या कमांडरने विमानात हवेचा दाब वाढवण्यासाठी विमानाला खाली आणलं. ज्यामुळे महिलेची प्रकृती थोडी स्थिर झाली व तिला वाचवता आलं, असं यूएस एअर फोर्सकडून सांगण्यात आलं.

    जर्मनीच्या रामस्टीन एअर बेसवर विमानाने लँडिंग करताच एअर फोर्सच्या ८६ व्या मेडिकल ग्रुपमधील डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. बाळाला आणि आईला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे.

    A woman gave birth to a cute baby girl at an altitude of 28,000 feet, gave birth in C-17 Globemaster

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan-Afghan : अफगाणिस्तान-पाक सीमेवर स्थिती बिघडली; युद्धाच्या तोंडावर शेजारी देश, चीनची तैवानमध्ये आघाडी उघडण्याचे संकेत

    Pakistan Airstrikes : अफगाणिस्तानवर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ४०० जणांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी

    PM Shehbaz Sharif : इंधन संकटामुळे पाकिस्तानात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30 टक्के कपात, सरकारी कंपन्यांसाठी शरीफ सरकारचा निर्णय