• Download App
    अबब ! मासेमारी करणाऱ्या एका कोळ्यांच्या जाळ्यात सापडला चक्क आयफोनचा खजिनाA treasure trove of chucky iPhones was found in a fishing net

    अबब ! मासेमारी करणाऱ्या एका कोळ्यांच्या जाळ्यात सापडला चक्क आयफोनचा खजिना

    एका मच्छिमाराने याचा व्हिडीओ बनवून टाकला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला पसंतीही मिळताना दिसत आहे.A treasure trove of chucky iPhones was found in a fishing net


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना जाळ्यात नेहमी माश्यांसोबत काहीना काही सापडत असतं.पण आज जाळ्यात अस काही सापडलं आहे की , त्यामुळे कोळ्यांच त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. इंडोनेशियातील मच्छिमारी करणाऱ्यांना जाळ्यात आयफोनचे भरलेले, सीलबंद बॉक्स लागले आहेत.एका मच्छिमाराने याचा व्हिडीओ बनवून टाकला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला पसंतीही मिळताना दिसत आहे.



    नेमकी घटना काय घडली

    इंडोनेशियातील मासेमारी करणारं एक पथक बांग्का बेलितुंग नदीत मासेमारी करायला गेलं होतं. तिथे त्यांची नजर पाण्यावर तरंगणाऱ्या काही बॉक्सेसवर पडली. दरम्यान मासेमारी करणाऱ्या पथकाने त्यांच्या होडीला बॉक्सजवळ नेली.

    त्यानंतर त्यांनी ते बॉक्स होडीत घेतले.त्या बॉक्सेसना उघडून पाहिल्यानंतर आत आयफोन, आयपॅड्स, मॅकबुक्स दिसले. ते पाहून त्यांना धक्काच बसला. या सगळ्या मालाची किंमत काही कोटींमध्ये आहे.

    A treasure trove of chucky iPhones was found in a fishing net

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार