• Download App
    शक्तिशाली भूकंपामुळे हादरले न्यूझीलंड, रिश्टर स्केलवर 7.0 होती तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट|A powerful earthquake shook New Zealand, magnitude 7.0 on the Richter scale, tsunami alert

    शक्तिशाली भूकंपामुळे हादरले न्यूझीलंड, रिश्टर स्केलवर 7.0 होती तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट

    वृत्तसंस्था

    वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी होती. न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटावर हा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, हा भूकंप न्यूझीलंडमध्ये चीनच्या वेळेनुसार रात्री 8.56 वाजता झाला.A powerful earthquake shook New Zealand, magnitude 7.0 on the Richter scale, tsunami alert

    यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर आत होता. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.



    6 फेब्रुवारीला तुर्कियेत झाला होता भूकंप, 47 हजारांवर मृत्यू

    6 फेब्रुवारी रोजी झालेल्या तीन मोठ्या भूकंपांमुळे तुर्की आणि सीरियामध्ये तब्बल 47 हजारांपेक्षाही जास्त मृत्यू झाले. तुर्कीमध्ये 41,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर सीरियामध्ये 5,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दोन्ही देशांतील 2 कोटी 60 लाख लोकांना मदतीची गरज होती. गेल्या 75 वर्षांत पहिल्यांदाच डब्ल्यूएचओने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम राबवली.

    A powerful earthquake shook New Zealand, magnitude 7.0 on the Richter scale, tsunami alert

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला