विशेष प्रतिनिधी
ब्रुसेल्स – ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे चिंतेत भर पडत असून त्याचा फटका नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना बसण्याची शक्यता आहे. बहुतांश देश ओमिक्रॉनला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून काही देशांनी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.70 percents hospitals full due to corona
तर काही देश नवीन वर्षाच्या आनंदावर विरजन पडू नये यासाठी निर्बंध लागू करण्याबाबत पुनर्विचार करत आहेत.ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे रुग्ण संख्या वाढत चालली असली तरी निर्बंधाबाबतच्या हालचाली संथच आहेत. आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी म्हटले की, ब्रिटनमध्ये नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत.
सध्या ब्रिटनमध्ये एक लाखापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. सध्या ७० टक्के रुग्णालये भरले आहेत. ते म्हणाले की, नवीन वर्ष उजाडल्यानंतरच निर्बंध लागू करायचे की नाही, हे ठरवले जाईल. तोपर्यंत अन्य निर्बंध लागू केले जाणार नाहीत.
त्याचवेळी ब्रिटनमधील अन्य ठिकाणी स्कॉटलंड, नॉदर्न आयर्लंड आणि वेल्समध्ये नाइट क्लब बंद करण्याचे आदेश असून अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे.
नेदरलँडमध्ये शाळेच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यघक नसलेले दुकाने, रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कालपासून लागू केलेल्या नवीन नियमांनुसार खरेदीसाठी गर्दी करण्यावर निर्बंध आणले आहेत. सिनेमागृह तसेच संगीत कार्यक्रमही बंद करण्यात आले आहेत.
70 percents hospitals full due to corona
महत्त्वाच्या बातम्या
- राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला, 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट
- आर्थिक दुर्बल घटकांसाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादाच कायम
- धर्मसंसदेतील आक्षेपार्ह वक्तव्य, कालीचरण महाराज यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
- भारतातील सर्वात उंचीवर असलेल्या घुम रेल्वे स्टेशनमध्ये बर्फवृष्टी! पर्यटकांनी घेतला आनंद