वृत्तसंस्था
न्यापिडॉ : म्यानमारच्या आंग सान सू की सरकारने सोमवारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे (एनएलडी) माजी खासदार फ्यो जेयार थॉ, लोकशाही समर्थक क्वा मिन यू (को जिम्मी) आणि इतर दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या चौघांवर दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप होता.4 people including pro-democracy former MP sentenced to death in Myanmar, accused of involvement in terrorist activities
म्यानमारमध्ये ५० वर्षांत एखाद्याला फाशी देण्याची पहिलीच वेळ आहे. या लोकशाही समर्थकांना जानेवारीत शिक्षा सुनावली होती. राष्ट्रीय एकता सरकारचे मानवी हक्क मंत्री आंग मायो मिन यांनी लोकशाही समर्थकांवरील आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, मृत्युदंड देणे हा भीतीच्या माध्यमातून लोकांवर शासन करण्याचा प्रयत्न आहे.
माजी खासदार फ्यो जेया थो यांना माउंग क्वान या नावानेही ओळखले जात होते. क्वान यांच्या पत्नी थाजिन न्युंत ओंग म्हणाल्या, पतीला फाशी देणार असल्याबाबत मला कळवले नव्हते. क्वान यांच्याशिवाय दहशतवादविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोकशाही समर्थक ५३ वर्षीय क्वाव मिन यू यांनाही फाशी दिली आहे. त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. याशिवाय लष्कराची हेर असल्याच्या संशयावरून मार्च २०२१ मध्ये एका महिलेचे लैंगिक शोषण व तिची हत्या केल्या प्रकरणात दोषी ठरवलेल्या ह्यू म्यो ओंग आणि ओंग थुरा जो यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
फाशी दिल्याच्या निर्णयाचा देशभरात निषेध
आशियातील ‘ह्यूमन राइट्स वॉच’च्या संचालिका अॅलेन पियर्सन यांनी ४ लोकांविरोधात केलेली कारवाई क्रूर असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या, ही राजकारणापासून प्रेरित लष्करी कारवाई आहे. मानवी हक्काशी संबंधित प्रकरणांचे संयुक्त राष्ट्राचे तज्ज्ञ थॉमस अँड्ऱ्यू यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे.
4 people including pro-democracy former MP sentenced to death in Myanmar, accused of involvement in terrorist activities
महत्वाच्या बातम्या
- 9 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार
- १०० कोटींमध्ये राज्यसभेची जागा, राज्यपाल करण्याचे आमिष, CBIने केला टोळीचा पर्दाफाश
- द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत का कमजोर झाला रुपया? कशी सांभाळणार स्थिती? वाचा सविस्तर…
- Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम