विशेष प्रतिनिधी
ग्लासगो : तामिळनाडूतील अवघे 14 वर्षे वय असलेली विनिषा उमाशंकर ही अर्थशॉट पारितोषिकाची अंतिम स्पर्धक आहे. ग्लासगो येथे झालेल्या cop२६ हवामानबदल परिषदेत तिने जागतिक नेत्यांना संबोधित केले. आपल्या प्रभावी भाषणाने तिने श्रोत्यांकडून तसेच प्रिन्स विल्यम यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवली.
14-year-old Vinisha Umashankar’s appeal to world leaders at the World Conference
आपल्या शक्तिशाली भाषणामध्ये तिने जगभरातील नेत्यांना बोलणे थांबून करणे सुरु करा असे आवाहन केले. विनिषा हिने तिच्यासारख्या आणखी अनेक तरुणांच्या ‘रिपेअर द प्लॅनेट’ या उद्देशासाठी जागतिक नेत्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले. ती प्रिन्स विल्यम यांच्या अर्थशॉट पारितोषिकाची अंतिम स्पर्धक आहे ज्याला इको ऑस्कर असेही म्हणतात.
ग्रेटा थांबता थांबेना; दिशाच्या समर्थनार्थ पुन्हा ट्विट; लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच!!
विनिषाने पाच मिनिट यापेक्षाही कमी काळ भाषण केले. परंतु ते इतके प्रभावी होते की प्रिन्स विल्यम हे स्टेजवर उभे राहून अगदी अभिमानाने तिचे बोलणे ऐकत होते. तिच्या भाषणामध्ये ती असे म्हणाली की, “मी फक्त भारतातील मुलगी नसून पृथ्वीवरील एक मुलगी आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी एक विद्यार्थी तसेच पर्यावरणवादी आणि उद्योजक देखील आहे. हे सर्वात महत्वाचे आहे, की मी एक आशावादी मुलगी आहे.”
प्रिन्स विल्यम यांनी त्यांच्या आणि पत्नी केट मिडलटन यांच्या नावावर असलेल्या अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “जागतिक व्यासपीठावर उमाशंकर यांना बोलताना पाहून मला खूप अभिमान वाटला. ते म्हणाले की, “विनिषा ही बदलाची मागणी करत असून ती तिच्या पिढीला चांगले भविष्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे.” उमाशंकर हिने भारतामध्ये हवेची गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी सौरउर्जेवर चालणारी इस्त्री कार्ट तयार केली आहे. १९६० च्या दशकात अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी केलेल्या मूनशॉट प्रकल्पामुळे माणसाला चंद्रावर जाण्याची प्रेरणा मिळाली होती.
उमाशंकर यांनी स्वीडिश हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या कार्याची प्रेरणा घेतली आहे.
14-year-old Vinisha Umashankar’s appeal to world leaders at the World Conference
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान