• Download App
    10,000 ऑक्सिजन जनरेटर्स, 1 कोटी मास्क... कोरोनाच्या लढाईत संयुक्त राष्ट्राकडून भारताला मोठी मदत । 10000 Oxygen Generators United Nations Aid To India Amid Corona Crisis

    10,000 ऑक्सिजन जनरेटर्स, 1 कोटी मास्क… कोरोनाच्या लढाईत संयुक्त राष्ट्राकडून भारताला मोठी मदत

    United Nations Aid To India : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्राकडून मोठी मदत मिळाली आहे. आतापर्यंत १०,००० ऑक्सिजन जनरेटर्स आणि 1 कोटी मास्क संयुक्त राष्ट्राद्वारे भारताला पुरविण्यात आले आहेत. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी दिली. यूएनचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, भारतातील संयुक्त राष्ट्र संघ मदत करतच आहे. केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सातत्याने मदत केली जात आहे. 10000 Oxygen Generators United Nations Aid To India Amid Corona Crisis


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्राकडून मोठी मदत मिळाली आहे. आतापर्यंत १०,००० ऑक्सिजन जनरेटर्स आणि 1 कोटी मास्क संयुक्त राष्ट्राद्वारे भारताला पुरविण्यात आले आहेत. ही माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी दिली. यूएनचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, भारतातील संयुक्त राष्ट्र संघ मदत करतच आहे. केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सातत्याने मदत केली जात आहे.

    माध्यमांशी बोलताना यूएनचे मुख्य प्रवक्ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना आणि यूएन पॉप्युलेशन फंडने आतापर्यंत १०,००० ऑक्सिजन जनरेटर्स भारतात पुरवले आहेत. याव्यतिरिक्त सुमारे 1 कोटी वैद्यकीय मास्क आणि सव्वा कोटी फेस शिल्डदेखील पाठविण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने भारताला मदत करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन उत्पादक प्लांटदेखील खरेदी केले आहेत. याशिवाय युनिसेफ कोरोनाशी सामना करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणेही पुरवित आहे. ते म्हणाले की, आमच्या कार्यसंघाने मोठ्या प्रमाणात टेस्टिंग मशीन्स आणि किटदेखील खरेदी केल्या आहेत. याशिवाय एअरपोर्ट थर्मल स्कॅनरसुद्धा खरेदी केले आहेत.

    संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की, जागतिक आरोग्य संघटना तात्पुरत्या आरोग्य सुविधांसाठी टेंट आणि बेडसुद्धा पुरवत आहेत. याव्यतिरिक्त, एजन्सीने हजारो सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञदेखील तैनात केले आहेत. जेणेकरून कोरोनाचा मुकाबला करता येईल. इतकेच नव्हे, तर युनिसेफ आणि यूएन डेव्हलपमेंट प्रोग्राम भारतातील 1,75,000 लसीकरण केंद्रांवर देखरेख ठेवण्यास मदत करत आहेत. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीटा फोरे पूर्वी म्हणाल्या होत्या की, भारतात वाढत्या कोरोना संसर्गामुळे आपल्या सर्वांसाठी चिंता वाढली आहे. या काळात संपूर्ण जगाने पुढे आले पाहिजे आणि भारताला मदत केली पाहिजे, जेणेकरून महामारीला आळा बसेल.

    10000 Oxygen Generators United Nations Aid To India Amid Corona Crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!