• Download App
    अफगाणिस्तानातील 100 हिंदू-शीख नागरिक भारतात येण्याच्या प्रतीक्षेत, ई-व्हिसा नसल्याने अडचण100 Hindu-Sikh citizens from Afghanistan waiting to come to India, problem due to lack of e-visa

    अफगाणिस्तानातील 100 हिंदू-शीख नागरिक भारतात येण्याच्या प्रतीक्षेत, ई-व्हिसा नसल्याने अडचण

     

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील 100 शीख व हिंदू नागरिक भारतात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना अद्याप ई-व्हिसा मिळालेला नसल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे, अशी माहिती अफगाणिस्तानातील शीख नेत्याने दिली आहे. 100 Hindu-Sikh citizens from Afghanistan waiting to come to India, problem due to lack of e-visa

    काबूल येथील गुरुद्वारा व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष गुरमानसिंह राजवंशी शुक्रवारी पाच कुटुंबीयांसह भारतात दाखल झाले आहेत. परंतु त्यांचा मुलगा ई-व्हिसाची प्रतीक्षा करत आहे. जवळपास 28 लोकांना व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे दोन्ही समुदायातील एकूण 100 लोक व्हिसाची प्रतीक्षा करत आहेत.

    भारत सरकारने हे व्हिसा मंजूर करावेत, अशी विनंती राजवंशी यांनी केली आहे. तालिबानमधील परिस्थिती अत्यंत हिंसक बनलेली आहे. त्यामुळेच आम्ही महिला, मुले यांना तेथे एकटे ठेवू शकत नाही. 18 जून रोजी काबूल येथील गुरुद्वारावर हल्ला झाल्यानंतर 66 अफगाणी शीख व हिंदू भारतात स्थलांतरित झाले.

    या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. आमच्या व्यवसायाचेदेखील मोठे नुकसान झाले. कारण आमच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. खरे तर आमचा जन्म अफगाणचा आहे. वाढही तेथेच झाली. परंतु आता तेथे परतण्याची कल्पनाही करू शकत नाही.

    100 Hindu-Sikh citizens from Afghanistan waiting to come to India, problem due to lack of e-visa

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या