ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असणार आहेत.Twitter CEO Jack Darcy resigns, Kangana says – “Bye bye Uncle Jack”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगभरात ट्विटर अत्यंत महत्त्वाचं माध्यम समजलं जातं. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. खूप मोठा वर्ग आहे जो ट्विटरचा वापरकर्ता आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पराग अग्रवाल हे ट्विटरचे नवे सीईओ असणार आहेत.
दरम्यान जॅक डाॅर्सीच्या राजीनाम्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर खूश झाल्याचे दिसत आहे.यावेळी अभिनेत्री कंगनाने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीच्या माध्यमातून आनंद व्यक्त करताना “बाय बाय चाचा जॅक…” अशी जॅक डाॅर्सीवर टीका केली आहे. अनेक सेलेब्रिटिंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पराग अगरवाल यांचं ट्विटरच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदन केलं आहे.