विशेष प्रतिनिधी
तुतिकोरीन – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस हाच उतारा आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.त्या म्हणाल्या की लशीमुळे उद्योगपती नियमित व्यवसाय करू शकत आहेत. व्यापाऱ्यांना माल मिळतो आहे.Vaccination is important for economy
शेतकरी शेतीची कामे पार पाडत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. देशात आतापर्यंत ७३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरु आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, आपली सारी प्रार्थना तिसरी लाट येऊ नये म्हणूनच आहे, पण ती आली तर रुग्णालये आहेत का याचा विचार करावा लागेल.
रुग्णालये असतील तर तेथे अतिदक्षता विभाग आहे का, तो असल्यास ऑक्सिजन आहे का हे प्रश्न असतात. दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होत असताना अशा साऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आमच्या मंत्रालयाने सुरु केलेल्या योजनांमुळे रुग्णालये सुसज्ज होत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णालयांनाही विस्तारीकरण करणे शक्य झाले.
Vaccination is important for economy
महत्त्वाच्या बातम्या.
- भिवंडीत वाहतूक पोलिसांनीच भरले रस्त्यावरचे खड्डे, सामाजिक बांधिलकीतून उपक्रम; केवळ आंदोलन करणाऱ्यांना मोठी चपराक
- लोकांचे प्रेम आहे तोपर्यंत माझी हकालपट्टी होणार नाही, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा विश्वास
- भारतीयांच्या काळ्या पैशाचा होणार पर्दाफाश, स्विस बॅँकेकडून सरकारला तिसरी यादी मिळणार
- कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ३० दिवसांत मृत्यू झाल्यासच कोरोनाने मृत्यू झाल्याचे धरले जाणार ग्राह्य