श्रीधर वेम्बू यांच्याबद्द काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील फोर्ब्स मासिकात खळबळजनक बातमी आली होती.
प्रतिनिधी
ऑनलाईन डेस्क : भारतीय तंत्रज्ञान कंपनी झोहोचे कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी त्यांची पत्नी प्रमिला यांचे आरोप फेटाळले आहेत. श्रीधर यांच्यावर प्रमिला यांनी त्यांना व त्यांच्या ऑटिस्टिक मुलाला सोडून दिल्याचा आरोप केला आहे. ज्यास श्रीधर वेम्बू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Zoho CEO Sridhar Vembu reacts to wifes serious allegations
”हा माझ्या चारित्र्यावर चुकीचे वैयक्तिक हल्ले केला जात आहेत आणि निंदा केली जात असल्याने माझ्यावर प्रतिक्रिया देण्याची वेळ आली आहे. माझ्या आयुष्यातील हा एक अतिशय वेदनादायक वैयक्तिक धागा आहे. माझे वैयक्तिक जीवन, माझ्या व्यावसायिक जीवनाच्या उलट, एक दीर्घ शोकांतिका राहिली आहे. ऑटिझमने आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि मला निराशकरून सोडले आहे.” असं वेम्बू म्हणाले आहेत.
American Visa Application : अमेरिकेची मोठी घोषणा, यावर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार
याशिवाय आपली बाजू मांडताना वेम्बू यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “मी प्रमिला आणि माझ्या मुलाला आर्थिकदृष्ट्या सोडून दिले आहे, असे म्हणणे पूर्ण काल्पनिक आहे.” तसेच ते पुढे म्हणाले, “माझा यूएसचा पगार गेल्या ३ वर्षांपासून तिच्याकडे आहे आणि मी आमचे घरही तिला दिले आहे.”
काही दिवसांपूर्वी अमेरिकन बिझनेस मॅगझीन फोर्ब्सने वेम्बू यांच्यावर एक बातमी छापली होती. यामध्ये सांगण्यात आलं होतं की कशाप्रकारे त्यांनी कथितरित्या त्यांची पत्नी प्रमिला (ज्यांच्यासोबत ते घटस्फोट घेणार आहेत) व त्यांच्या ऑटिस्टिक मुलाला आहे त्या परिस्थितीत सोडलं आहे आणि त्यांना त्यांचा हिस्सा मिळण्यापासून रोखत आहेत.
Zoho CEO Sridhar Vembu reacts to wifes serious allegations
महत्वाच्या बातम्या
- अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडून मुलाचा मृत्यू : खेळता-खेळता 15 फूट खाली पडला 5 वर्षीय मुलगा; उपचारादरम्यान मृत्यू
- जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचा संप, काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
- अलाहाबाद कोर्ट परिसरातील मशीद हटवा, अन्यथा ध्वस्त करू; सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला हायकोर्टाचा निकाल
- काँग्रेसच्या तब्बल चार मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रमुख राहिलेले संघ प्रचारक श्रीपाद सहस्त्रभोजने कालवश!!