विशेष प्रतिनिधी
दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमेझॉन कंपनीच्या भारतातील काही कायदेशीर प्रतिनिधींवर भारतीय सरकारला लाच दिल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. अमेझॉन कंपनीने यावर दिलेल्या वक्तव्यामध्ये याची पुष्टी केली नाही आणि या आरोपाचे खंडनही केले नाहीये. पण आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचाराबद्दल कोणतीही सहनशीलता नाहीये, असे ठामपणे सांगितले आहे.
‘zero tolerance for corruption’, amazon clarifies after allegations of bribing indian officials
या सर्व गोष्टींविरुद्ध अमेझॉन कंपनीने एक इन्व्हेस्टिगेशन टीम भारतामध्ये पाठवली आहे. ज्या व्यक्तींविरुद्ध हे आरोप करण्यात आले आहेत, त्या सर्वांना सध्या कामावर हजर राहू नये असे देखील सांगितले आहे. एका विकसनशील देशाच्या सरकारला लाच देणे ही काही छोटी गोष्ट नाहीये. त्यामुळे अमेझॉन कंपनी या सर्व गोष्टीला खूपच सीरियसली घेत आहे असे दिसून येते.
ॲमेझॉन जागतिक स्तरावर 55,000 लोकांना कामावर ठेवेल, या महिन्यात रोजगार मेळावा सुरू होईल
दरम्यान व्यापारी संघटना ‘सीएआयटी’ ने या सर्व प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या विश्वासार्हते संबंधी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. सरकारमधील सर्व स्तरांवर भ्रष्टाचार दूर करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे, असे देखील त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेल्या संबंधित अधिकार्यांची नावे सार्वजनिक करावीत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाही लवकरात लवकर करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. भारतातील ई कॉमर्स व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई वेळेत व्हावी अशी अपेक्षा सीएआयटीने व्यक्त केली आहे.
अमेझॉन आणि फ्यूचर ग्रुप या दोघांमध्ये कायदेशीर संघर्ष आधीपासून सुरू आहेत. त्यामध्ये अमेझॉन कंपनीला फ्युचर ग्रुप किंवा रिलायन्स रिटेल व्हेन्चर लिमिटेड यांच्या पैकी एकासोबत २४७१३ कोटी रूपयांचा करार करायचा आहे. या सर्व गोष्टींवर सुरू असलेल्या वादावरून अमेझॉनने फ्युचर ग्रुपला सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रामध्ये देखील खेचले होते. आरोप करताना अमेझॉनने म्हटले होते की फ्युचर ग्रुपने प्रतिस्पर्धी रिलायन्स रिटेल सोबत करार करून आमच्यासोबतच्या कराराचे उल्लंघन केले आहे. नक्की कोणत्या गोष्टी खऱ्या खोट्या आहेत हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकते.
‘zero tolerance for corruption’, amazon clarifies after allegations of bribing indian officials
महत्त्वाच्या बातम्या
- Pornographic Case : पॉर्नोग्राफी केसमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन, 19 जुलैपासून होता
- मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- Corona Vaccine : गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर लसीचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर
- इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, सीरियल बॉम्बस्फोटांचा केला दावा
- रशियाच्या पर्म स्टेट युनिव्हर्सिटीत माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार, 8 विद्यार्थी ठार, अनेक जण जखमी