• Download App
    International Yoga Day : ‘’योग भारतातून आला आहे; कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे’’ Yoga came from India Free from copyright patent and royalty PM Modi

    International Yoga Day : ‘’योग भारतातून आला आहे; कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे’’

    UN मुख्यालयातून मोदींनी संपूर्ण जगाला केले संबोधित, १८० देशांचे प्रतिनिधींनी केला ‘योग’

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी UN मुख्यालयात पोहोचले. हा कार्यक्रम यूएनच्या नॉर्थ लॉनवरील गार्डनमध्ये होत आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम, शेफ विकास खन्ना, संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा साबा कोरोसी यांच्यासह १८० देशांतील लोक यात सहभागी झाले आहेत. International Yoga  Day Yoga came from India  Free from copyright patent and royalty PM Modi

    यूएन मुख्यालयात पंतप्रधान मोदींचे भाषण  –

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, योग भारतातून आला आहे आणि ही खूप जुनी परंपरा आहे. योग कॉपीराइट, पेटंट आणि रॉयल्टीपासून मुक्त आहे. तुमचे वय, लिंग आणि तंदुरुस्तीच्या पातळीनुसार योगासने जुळवून घेतली जाते. योग पोर्टेबल आहे.

    योग म्हणजे जुडणे –

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्हा सर्वांना पाहून मला आनंद झाला आणि आल्याबद्दल सर्वांचे आभार. मला सांगण्यात आले आहे की आज येथे जवळजवळ प्रत्येक राष्ट्रीयतेचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. योगाचा अर्थ आहे जोडणे, त्यामुळे योगासाठी तुम्ही एकत्र येत आहात.

     UNA अध्यक्ष साबा कोरोसी काय म्हणाले? –

    मी शिकलो आहे की ब्रम्हांडात आणि आपल्यात ज्या सर्व शक्ती आहेत, त्या सर्व एक नियम पाळतात आणि तो म्हणजे संतुलन साधणे. योग नेहमीच आपल्याला शारीरिक बदल घडवतो. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. जी बराच काळापासून योग करत आहे. यामुळे मला योग अधिक चांगल्या प्रकारे समजू शकला आहे.

    International Yoga Day Yoga came from India  Free from copyright patent and royalty PM Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव