• Download App
    अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर सालेह यांचा पत्ताच लागेना? |Yet no trace for Saleh in Afghanistan

    अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर सालेह यांचा पत्ताच लागेना?

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. नॅशनल रेजिस्टेंन्स फोर्सच्या सूत्रानुसार, अमरुल्लाह सालेह हे आपल्या समर्थकांसह ताजिकस्तानमध्ये पोचले आहेत.Yet no trace for Saleh in Afghanistan

    पंजशीर खोऱ्याला जेव्हा तालिबानने वेढा घातला तेव्हा ताजिकिस्तान सरकारने सालेह यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. परंतु काहींनी सालेह ताजिकिस्तानमध्ये नसल्याचे म्हटले आहे. तालिबानच्या विरोधात पुन्हा नव्याने आघाडी करण्यासाठी सालेह यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.



    तालिबानच्या विरोधात उभे राहिलेले सालेह यांच्या घरी तालिबानचा कब्जा झाला तरी त्यांचा शोध घेऊ शकले नाही. सालेह सुरक्षित असून त्यांनी अन्य ठिकाणी आश्रय घेतला असल्याचे वृत्तही आले आहे. काही काळापूर्वी त्यांच्या घरातून सोने आणि डॉलर मिळण्याचा दावा केला होता.

    परंतु तालिबानने या वृत्ताचे खंडन केले होते. तालिबानने पंजशीरच्या लढाईत अमरुल्लाह सालेह यांच्या भावाला रोहुल्ला अझिझी यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह दफन करण्यासही विरोध केला होता.

    Yet no trace for Saleh in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या