सर्वाधिक काळ चीनचे राष्ट्राध्यक्ष राहणारे नेते म्हणूनही ओखळले जाणार
शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, ज्यामुळे ते मागीली काही काळातील सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. शी जिनपिंग यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाचे (CCP) प्रमुख म्हणून आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाल्यानंतर, चीनच्या रबर-स्टॅम्प संसदेने त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. Xi Jinping elected Chinese President for Third time
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे केंद्र सरकारला पत्र, बंगालमध्ये अफूच्या लागवडीची मागितली परवानगी
ऑक्टोबरपासून, ६९ वर्षीय शी जिनपिंग यांना त्यांच्या शून्य-कोविड धोरणाच्या मृत्यूच्या संख्येबद्दल आणि नंतर ते रद्द केल्याबद्दल व्यापक निषेधाचा सामना करावा लागला आहे. मात्र, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) च्या या आठवड्यात झालेल्या बैठकीत हे मुद्दे टाळण्यात आले आणि त्याच बैठकीत जिनपिंग यांच्या जवळचे मानले जाणारे ली कियांग यांचीही नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
शुक्रवारी, सर्व प्रतिनिधींनी शी जिनपिंग यांना तिसर्यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. याचबरोबर त्यांना देशाच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून एकमताने निवडले. या निवडीमुळे चिनपिंग आता चीनचे सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्ष राहणारे नेते बनले आहेत.
Xi Jinping elected Chinese President for Third time
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत
- उद्धव ठाकरे यांना बजेटवर बोलायला लावून अजितदादांनी कुणाला मारला डोळा??