चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे हयात भर चीनचे सर्वोच्च नेते राहणार होते. चिनी कम्युनिस्ट पार्टीने त्यांचे स्थान कम्युनिस्ट क्रांतीचा सर्वोच्च नेता माओ झेडॉंग यांच्यानंतरचे असल्याचे सुनिश्चित केले होते. त्यामुळे चीनला माओ यांच्यानंतरचा धडाकेबाज सर्वोच्च नेता मिळाला, असे ढोल ताशे चिनी राज्यकर्त्यांनी आणि चिनी माध्यमांनी पिटले होते. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन अमेरिकेला मागे टाकून जगातली महासत्ता बनणार अशी जाहिरातबाजी सुरू होती. Xi Jinping
– पोलादी पडद्याची भोके
पण गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि नंतरच्या हालचाली यातून माओ नंतरचा चीनचा सर्वोच्च नेता बनायची शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाल्याचे दिसून आले. चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्याआड काय घडते?, हे फारसे बाहेर समजत नाही. पण सध्याच्या “अतिमोकळ्या” वातावरणात त्या पोलादी पडद्याला पडलेली भोके आतले दाखवायचे देखील राहत नाहीत. त्यामुळेच शी जिनपिंग यांच्या हातातून सत्ता निसटल्याची सगळी चिन्हे सगळ्या जगाला दिसली.
शी जिनपिंग हे ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला हजर राहिले नाहीत. त्याआधी ते तब्बल दोन आठवडे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. किंबहुना ते “गायब” झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या होत्या. त्यांच्या तब्येती विषयीच्या चिंता चिनी माध्यमांमधून व्यक्त होत होत्या. या सगळ्यातून जिनपिंग यांचे सध्या काही बरे चाललेले नाही एवढे सगळ्या जगाला दिसत होते. पण त्याआधी गेल्या दोन वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचे खरं म्हणजे ते पडसाद होते.
– हू जिंओता एपिसोड
दोनच वर्षांपूर्वी शी जिनपिंग यांनी आपल्या मनाप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे चिनी कम्युनिस्ट पार्टीची CCP रचना बदलली. नवे पंतप्रधान, नवे संरक्षण मंत्री, नवे परराष्ट्रमंत्री सगळे नेमले, पण गेल्या वर्षभरामध्ये त्यातले संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री अचानक “गायब” झाले. ते नंतर चीनमध्ये किंवा जगात कुठेच दिसले नाहीत. त्यानंतर चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीमध्ये हू जिंताओ एपिसोड घडला. हू जिंओता यांच्यासारख्या एका वरिष्ठ नेत्याला, ज्याने चीनचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले, त्याला अपमानास्पद रित्या बाहेर काढल्याचे सगळ्या जगाने पाहिले. त्यावेळी शी जिनपिंग यांची सत्तेवरची पकड किती मजबूत आणि पोलादी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण हा प्रयत्न अल्पकाळात फोल ठरला. कारण शी जिनपिंग यांच्या हातातून चीनची सत्ता निसटल्याचे आता समोर आले. चिनी कम्युनिस्ट पार्टीची (CCP) रचना, चिनी लष्कराची (PLA) रचना यांच्यातल्या अमुलाग्र बदलाच्या बातम्या समोर आल्या. शी जिनपिंग यांच्या हातात एकवटलेली सत्ता आता आपल्या विश्वासू व्यक्तींकडे सोपविण्यात खेरीज पर्याय नसल्याचे उघड झाले म्हणून शी जिनपिंग सार्वजनिक जीवनापासून बाजूला होऊन “नवी रचना” करण्यात मग्न झाल्याचे बातम्यांमध्ये नमूद झाले केले गेले.
पण नेमके यातूनच माओनंतर चीनचा सर्वोच्च महान नेता बनणाऱ्या शी जिनपिंग यांच्या हातातून चीनची सर्वंकष सत्ता निसटल्याचे चिन्ह दिसून आले. अन्यथा त्यांच्या तब्येती विषयी चिंता व्यक्त करणाऱ्या बातम्या किंवा चिनी कम्युनिस्ट पार्टी आणि चिनी लष्कर यांच्यातल्या बदलाच्या बातम्या यांना एवढे प्राधान्य मिळाले नसते. पण Xinuha सारख्या चिनी माध्यम संस्थेने देखील या बातम्यांना महत्त्व दिले, याचा अर्थच शी जिनपिंग यांचे स्थान माओ नंतरचा चीनचा सर्वोच्च नेता असे उरले नसल्याचे सिद्ध झाले.
Xi Jinping ambition to become lifetime president of China drowning fast
महत्वाच्या बातम्या
- PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…
- Sri Lanka : श्रीलंकेने म्हटले- कोणत्याही किंमतीत कच्चाथीवू बेट सोडणार नाही; कायदेशीररीत्या ते आमचे
- पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
- Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार