Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल गेट्स यांचे आयुष्य चर्चेत आहे. बिल गेट्स यांच्याबद्दल ज्या अज्ञात बाबी उघडकीस येत आहेत, त्यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबतचा खुलासा केला आहे. WSJ reports Microsoft board members opened investigation into Bill Gates after a staffer said the pair had engaged in a sexual relationship
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल गेट्स यांचे आयुष्य चर्चेत आहे. बिल गेट्स यांच्याबद्दल ज्या अज्ञात बाबी उघडकीस येत आहेत, त्यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबतचा खुलासा केला आहे.
मायक्रोसॉफ्टमधील महिला कर्मचार्याशी रिलेशन
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या एका महिला कर्मचाऱ्याशी अवैध संबंध होते. त्या कारणास्तव मायक्रोसॉफ्ट कंपनीने बिल गेट्स यांच्याविरुद्धही चौकशीही केली होती. बिल यांच्यावर कंपनीच्या एका महिला कर्मचार्याशी शारीरिक संबंध असल्याचा आरोप होता आणि ते वैयक्तिक कारणासाठी कंपनीत तिची बाजू घेत होते.
तपासापूर्वीच बिल गेट्सनी सोडली कंपनी
कंपनीने बिल गेट्सविरुद्धची चौकशी एका लॉ फर्मकडे सोपविली होती, परंतु ही तपासणी पूर्ण होण्याआधीच बिल गेट्स कंपनी सोडून गेले. विशेष बाब म्हणजे या महिला कर्मचार्याने बिल गेट्सशी अफेअरची बाब मायक्रोसॉफ्ट संचालक मंडळाला पत्राद्वारेच सांगितली होती.
20 वर्षे जुन्या अफेअरची चर्चा
वॉल स्ट्रीटच्या वृत्तानुसार, बिल गेट्सच्या प्रवक्त्याने याबाबत निवेदन दिले होते की, 2019 मध्ये ही चौकशी चालू होती तरी ही गोष्ट 20 वर्षे जुनी आहे. ती महिला आणि बिल दोघेही परस्पर संमतीने रिलेशनशिपमध्ये होते. आणि हे संबंध दोघांच्या इच्छेने संपलेही होते. अशा परिस्थितीत या विषयाकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नाही. यामुळे गेट्स यांच्याविषयीच्या चर्चा आणि बोर्डाचे सदस्यत्व सोडण्यात कोणतेही साम्य नाही.
बिल गेट्स यांनी 2019 मध्ये दिला होता राजीनामा
सन 2019 मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट बोर्डाचा राजीनामा दिला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘आता त्यांना लोकांच्या हितासाठी काम करायचे आहे आणि म्हणूनच ते राजीनामा देत आहेत.’
यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात बिल गेट्स यांच्या रंगीबेरंगी मूडबद्दलही लिहिले होते. त्यात लिहिले होते की, बिल गेट्सचे यांचे त्यांच्या महिला सहकारी आणि माध्यमांतील मित्रांशी खूप जवळचे संबंध राहिलेले आहेत. परंतु कधीही कुणीही त्यांच्याबाबत नकारात्मक छापलेले नाही, कारण कुणालाही बिल गेट्स किंवा मायक्रोसॉफ्टशी वैर नको आहे.
बिल गेट्स यांचे खासगी आयुष्य चर्चेत
आता हे अफेअरच बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटामागे आहे अथवा नाही, हे स्पष्ट नाही. बिल गेट्स यांचे खासगी आयुष्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे बिल गेट्स हे जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांची पत्नी मेलिंडा यांची संपत्ती 2 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. मेलिंडा आणि बिल यांना लग्नापासून तीन अपत्ये आहेत (दोन मुली आणि एक मुलगा). लग्नाच्या 27 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला आहे.
WSJ reports Microsoft board members opened investigation into Bill Gates after a staffer said the pair had engaged in a sexual relationship
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : चक्रीवादळ तौकतेच्या मार्गात ओएनजीसीची बोट अडकली, 273 जणांच्या बचावासाठी भारतीय नौसेनेची दोन जहाजे रवाना
- मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने जिंकला Miss Universe 2021चा किताब, मिस इंडिया एडलिना कॅसलिनो टॉप फाइव्हमध्ये
- मध्य प्रदेशात लॉकडाऊनचे नियम मोडल्यास ‘राम नाम’ लिहिण्याची अनोखी शिक्षा
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोरोनावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा प्रस्ताव, डॉक्टरांच्या मदतीसाठी तयार होईल मनुष्यबळ
- DRDOने तयार केलेले अँटी कोरोना औषध 2DG लॉन्च; रिकव्हरी होणार फास्ट, ऑक्सिजनची गरजही कमी