• Download App
    जगातील सर्वात लहान खगोलशास्त्रज्ञ : ब्राझीलची आठ वर्षीय निकोल, शोधले 18 लघुग्रह | World's youngest astronomer : 8 year's old Brazilian girl Nicole Oliveira

    जगातील सर्वात लहान खगोलशास्त्रज्ञ : ब्राझीलची आठ वर्षीय निकोल, शोधले 18 लघुग्रह

    विशेष प्रतिनिधी

    ब्राझील : लहान मुलांच्या रुममध्ये अल्फाबेट्स, फ्रूट्स, ट्रीज, अनिमल्स यांसारखे चार्ट पाहायला मिळतात. पण ब्राझीलच्या निकोलच्या रुममध्ये मात्र सोलार सिस्टीम, मून, सन, गॅलेक्सी, ब्लॅक होल्स यांचे पोस्टर पाहायला मिळतात. खेळकर वयामध्ये ब्राझीलच्या निकोलने जगातील सर्वात लहान खगोलशास्त्रज्ञ होण्याचा मान मिळवला आहे.

    World’s youngest astronomer : 8 year’s old Brazilian girl Nicole Oliveira

    नासा आणि ब्राझील मिनिस्ट्री ऑफ सायन्स यांच्या भागीदारीमध्ये इंटरनॅशनल अस्ट्रॉनॉमिकल सर्च ऑर्गनायझेशनने सिटिझन सायन्स प्रोग्राम सुरू केला होता. या प्रोग्रामअंतर्गत निकोलने एकूण 18 लघुग्रह शोधण्यामध्ये यश मिळवले आहे. याआधी हा रेकॉर्ड 18 वर्षीय लुईस अमीनो हिच्या नावावर होता. लुईस ही इटालियन नागरिक आहे.


    SpaceX, NASA successfully launch first astronauts into orbit from US soil in nearly a decade.


    आपण शोधून काढलेल्या अठरा ग्रहांना निकोल आपले आई वडील, बहीण, भाऊ, फ्रेंड्स आणि ब्राझीलमधील खगोलशास्त्रज्ञ यांची नावे देणार आहे असे निकोलने वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. तरुण मुला मुलींना अवकाशात आणि विज्ञानाची ओढ लागावी, त्यांचा रस त्यामध्ये वाढावा यासाठी नासाने एस्टॉरॉइड हंटर्स नावाचा प्रोजेक्ट चालू केला होता. या अंतर्गत निकोलने हे यश मिळवले आहे.

    सुपरनोवा प्रोजेक्टचे भाग असणारे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ ट्युलिप या दे मेलो यांची मुलाखतही निकोलने घेतली आहे. मागील वर्षी निकोलने ब्राझीलच्या विज्ञान मंत्र्यांची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे अंतराळवीर मार्कोस कॉन्टेस्ट यांची देखील भेट घेतली होती. अवघ्या आठ वर्षाची निकोल सध्या जगातील सर्वात मोठ्या खगोल शास्त्रज्ञासोबत सेमिनार अटेंड करताना दिसून येत आहे.

    World’s youngest astronomer : 8 year’s old Brazilian girl Nicole Oliveira

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या