जगभरातच कोरोनाने झालेले मृत्यू लपविले गेले आहे. अधिकृत जाहीर आकड्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मृत्यू झाले असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.World Health Organization fears corona deaths worldwide, more than double or more than official figures
विशेष प्रतिनिधी
जिनेव्हा : जगभरातच कोरोनाने झालेले मृत्यू लपविले गेले आहे. अधिकृत जाहीर आकड्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मृत्यू झाले असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत जगात अधिकृत 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखाच्या आसपास आहे.
कोरोनामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, या सर्वच आकडेवारीची आपल्याकडे नोंद झालेली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भीती आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.
मे 2021 पर्यंत कोरोनामुळं 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र ही सरकारी आकडेवारी असून खरी संख्या दोन ते तीन पट अधिक असण्याची दाट शक्यता आहे,
असे जागतिक आरोग्य संघटनेच्या असिस्टट डायरेक्टर-जनरल (डेटा आणि एनालिटिक्स विभाग) समीरा आसमा यांनी सांगितले आहे. आपल्याला दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट अधिक आहेत.
त्यामुळे माझ्या मते आत्तापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दुसऱ्या आणि पहिल्या महामारीतही अनेक ठिकाणी रुग्णांना दवाखाने आणि खाट उपलब्ध होऊ शकत नव्हते, तेवढी आरोग्य व्यवस्थाच नव्हती. त्यावेळी नोंदीपेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत असे म्हटले आहे.
World Health Organization fears corona deaths worldwide, more than double or more than official figures
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावर औषधाचा दावा आणि हजारोंची रांग, आंध्र प्रदेश सरकारने तपासणीसाठी पाठविले पथक
- नारद भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीत दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद, अखेर ‘तृणमूल’चे नेते नजरकैदेत
- पुढील दशकात कोरोना सर्दी-खोकल्यासारखा सामान्य होणार, नव्या संशोधनात भाकित
- मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती ठेवली स्वतःकडेच, वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालय
- तुरुंगात असूनही निवडणूक जिंकलेले अखिल गोगोई यांना विधानसभेतच मारहाण
- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन झाले भावूक; आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर स्वाक्षरी