• Download App
    अफगाणिस्तानचा निधी जागतिक बँकेने रोखला, तालिबानमुळे अनेक प्रकल्प रखडणार World Bank stops funding to Afghanistan

    अफगाणिस्तानचा निधी जागतिक बँकेने रोखला, तालिबानमुळे अनेक प्रकल्प रखडणार

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – जागतिक बँकेने अफगाणिस्तानचा निधी रोखला आहे. तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तेथे सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी निधीचा पुरवठा थांबविण्यात आला. World Bank stops funding to Afghanistan

    २००२ पासून वॉशिंग्टनस्थित जागतिक बँकेने अफगाणिस्तानला पुनर्निर्माण आणि विकास प्रकल्पांसाठी ५.३ अब्ज डॉलर निधी दिला आहे. शुक्रवारी काबूलमधील आपल्या पथकातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे पाकिस्तानमध्ये आणले.



    तालिबानने बंदुकीच्या बळावर सत्ता काबीज केल्यानंतर बायडेन प्रशासनाने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची अमेरिकेतील मालमत्ता गोठविली आहे. ही मालमत्ता तालिबानसाठी उपलब्ध करून दिली जाणार नाही असे बजावण्यात आले आहे. दा अफगाणिस्तान बँकेचे राखीव स्रोत अंदाजे नऊ अब्ज डॉलर आहे, ज्यातील बहुतांश अमेरिकेत आहे.

    गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) अफगाणिस्तानचा निधी थांबविला. त्यानंतर जागतिक बँकेने असा निर्णय घेतल्यामुळे अफगाणिस्तानात नवे सरकार स्थापण्याच्या प्रयत्नात असलेल्या तालिबानला आर्थिक आघाडीवर आणखी एक धक्का बसला आहे.

    World Bank stops funding to Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार